शेअर बाजाराच्या माजी प्रमुखांचा पाय खोलात; सीबीआय कोठडीची हवा खावी लागली

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन प्रमुख चित्रा रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली आहे.
NSE Former CEO Chitra Ramkrishna
NSE Former CEO Chitra Ramkrishna Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दणका दिला असून, त्यांची सात दिवसांसाठी सीबीआय कोठडीत रवानगी केली आहे. (Share Market News)

चित्रा रामकृष्ण यांनी सीबीआय चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या तपासात सहकार्य करीत नव्हत्या. यामुळे अखेर रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सीबीआयने न्यायालयासमोर केली. रामकृष्ण यांची चौकशी करायची असून, त्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळत आहेत. पुराव्यांच्या आधारे त्यांची चौकशी करायची आहे, असेही सीबीआयने न्यायालयात सांगितले. यावर न्यायालयाने रामकृष्ण यांची सात दिवसांसाठी सीबीआय कोठडीत रवानगी केली.

NSE Former CEO Chitra Ramkrishna
ज्याच्या नादी लागून सगळं घालवलं त्या योगीला ओळखण्यासही चित्रा रामकृष्ण यांचा नकार

काही दिवसांपूर्वी रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळला आहे. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांना आता परदेशात पलायन करता येणार नाही. रामकृष्ण यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी गोपनीय माहिती योगीला दिल्याचा दाट संशय आहे.

NSE Former CEO Chitra Ramkrishna
काही दिवस गप्प बसा, तुम्हाला राष्ट्रपती करतो! खुद्द राज्यपालांनीच ऑफर केली उघड

या प्रकरणी ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली आहे. सीबीआयने त्यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तोच कथित योगी असल्याचेही स्पष्ट झाले होते. तोच योगी बनून चित्रा यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रह्मण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती ही चित्रा यांनी योगीच्या सांगण्यावरून घेतलेल्या वादग्रस्त निर्णय होता. तसेच, वेतन देतानाही अनियमितता दिसून आली आहे, असे सेबीच्या चौकशीत समोर आलं होतं. (Share Market Updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com