ज्याच्या नादी लागून सगळं घालवलं त्या योगीला ओळखण्यासही चित्रा रामकृष्ण यांचा नकार

राष्ट्रीय शेअर बाजाराच्या तत्कालीन प्रमुख चित्रा रामकृष्ण या एका योगीच्या सल्यानुसार महत्वाचे निर्णय घेत होत्या.
Anand Subramanian and Chitra Ramkrishna
Anand Subramanian and Chitra Ramkrishna Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांना केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (CBI) अटक करण्यात आली आहे. त्या तब्बल वीस वर्षे कथित हिमालयीन योगीच्या सल्यानुसार शेअर बाजार चालवत होता. शेअऱ बाजारातील वरिष्ठ अधिकारी आनंद सुब्रह्यण्मय हाच योगी होता, हे समोर आले आहे. त्यालाही अटक करण्यात आली असून, त्याला ओळखण्यासही चित्रा रामकृष्ण यांनी नकार दिला आहे. (Share Market News)

चित्रा रामकृष्ण आणि आनंद यांची समोरासमोर चौकशी करण्यात आली. चित्रा रामकृष्ण यांना अटक केल्यानंतर त्यांना सुब्रह्मण्यम यांच्यासमोर उभे करण्यात आले. त्यांना ओळखण्यासही रामकृष्ण यांनी नकार दिला. सुब्रह्मण्यम हाच हिमालयातील योगी बनून रामकृष्ण यांना सल्ला देत होता. ते दोघे एकत्र परदेशातही फिरायला गेले होते. त्या दोघांमधीत तब्बल अडीच हजार ई-मेल सीबीआयच्या हाती लागले आहेत. चित्रा रामकृष्ण यांनी सीबीआय चौकशीत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्या तपासात सहकार्य करीत नव्हत्या. यामुळे अखेर रामकृष्ण यांना सीबीआयने अटक केली.

काही दिवसांपूर्वी रामकृष्ण यांच्यावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले होते. नंतर त्यांची सीबीआयने चौकशी केली होती. रामकृष्ण यांच्या भोवतीचा केंद्रीय तपास यंत्रणांनी फास आवळला आहे. सीबीआयने रामकृष्ण यांच्यासह एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण आणि माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम यांच्या विरोधात लुकआऊट नोटीस बजावली आहे. यामुळे त्यांना आता परदेशात पलायन करता येणार नाही. रामकृष्ण यांच्या संपत्तीसह कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. त्यांनी गोपनीय माहिती योगीला दिल्याचा दाट संशय आहे.

Anand Subramanian and Chitra Ramkrishna
काही दिवस गप्प बसा, तुम्हाला राष्ट्रपती करतो! खुद्द राज्यपालांनीच ऑफर केली उघड

या प्रकरणी ‘एनएसई’चे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांना सीबीआयने 24 फेब्रुवारीला अटक केली आहे. सीबीआयने त्यांची तीन दिवस चौकशी केली होती. त्यातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. तोच कथित योगी असल्याचेही स्पष्ट झाले होते. तोच योगी बनून चित्रा यांच्याशी ई-मेलच्या माध्यमातून संपर्क साधत होता. सुब्रह्मण्यम यांची एनएसईमध्ये नियुक्ती ही चित्रा यांनी योगीच्या सांगण्यावरून घेतलेल्या वादग्रस्त निर्णय होता. तसेच, वेतन देतानाही अनियमितता दिसून आली आहे, असे सेबीच्या चौकशीत समोर आलं होतं. (Share Market Updates)

Anand Subramanian and Chitra Ramkrishna
नाईकांनी राष्ट्रवादीची वाट धरल्यानंतर आता महाडिक बंधू दाखवणार ताकद

चित्रा रामकृष्ण यांच्या 'सेबी'च्या (SEBI) 190 पानी चौकशी अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. एनएसईमध्ये कार्यरत असताना रामकृष्ण या कथित योगीच्या सल्याने निर्णय घेत होत्या. योगीच्या सल्ल्यानुसार त्या शेअर बाजार चालवत होत्या. त्या मागील वीस वर्षांपासून योगीच्या संपर्कात होत्या. योगीच्या सल्ल्याने रामकृष्ण यांनी 2013 मध्ये शेअर बाजाराचे ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि सल्लागार म्हणून आनंद सुब्रह्मण्यम (Anand Subramanian) यांची नियुक्ती केली होती. तसेच त्यांच्या वेतनातही भरमसाठ वाढ करण्यात आली. पण हे सुब्रमण्यमचं कथित योगी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. (Chitra Ramkrishna News)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com