Video Uddhav Thackeray-Eknath Shinde : शिंदे-ठाकरे येणार समोरासमोर !

OBC Vs Maratha Reservation : ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलाविण्यात आलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब आंबेडकर यासारखे 45 नेते आणि अधिकारी राहणार उपस्थित राहणार आहेत.
Uddhav Thackeray- Raj Thackeray- Eknath Shinde
Uddhav Thackeray- Raj Thackeray- Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत चर्चा करण्यासाठी येत्या सोमवारी (8 जुलैला) मुंबईत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. या बैठकीच्या निमित्ताने ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाज विरुद्ध ओबीसी आरक्षणावरून जोरदार वातावरण तापले आहे. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तर ओबीसीमधून मराठ्यांना आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, यासाठी ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत.

त्यामुळे राज्यात मराठा विरोधात ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. मनोज जरांगे यांनी वेळ पडल्यास आगामी विधानसभेच्या निवडणुकीत 288 उमेदवारांना पडण्याची तयारी दर्शवली आहे.तर आपली भूमिका स्पष्ट करताना लक्ष्मण हाकेंनी देखील मुख्यमंत्र्यांपासून ते घनसांगवी चे आमदार राजेश टोपे यांच्यापर्यंत सर्व पडले पाहिजेत असं जाहीर वक्तव्य केलं आहे.

Uddhav Thackeray- Raj Thackeray- Eknath Shinde
Manoj Jarange Rally : शांतता रॅलीत पहिलाच वार छगन भुजबळांवर; मनोज जरांगेंचा सरकारला मोठा इशारा

गेल्या काही महिन्यांपासून मराठा, ओबीसी समाजातील हा संघर्ष अधिकच तीव्र होत असून त्याचे जोरदार पडसाद विविध भागात पहायला मिळत आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, यासाठी मनोज जरांगे यांनी 13 जुलैपर्यंत राज्य सरकारला मुदत दिली आहे.

तोपर्यंत निर्णय न घेतल्यास मुंबईत येऊन बैठक घेण्यााचा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने गेल्या आठवड्यात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. मात्र अचानकपणे ही बैठक रद्द करण्यात आली होती. यासाठी कोणतेही ठोस कारण देण्यात आलेले नव्हते.

मराठा तसेच ओबीसी समाजातील वाढत असलेला संघर्ष लक्षात घेता आता राज्य सरकारने येत्या सोमवारी मुंबईत एक बैठक बोलाविली आहे.विशेष म्हणजे या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.

या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उद्धव ठाकरे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सह्याद्री अथीतीगृह येथे सायंकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे. याबाबतचे वृत्त 'साम' टिव्हीने दिले आहे.

Uddhav Thackeray- Raj Thackeray- Eknath Shinde
OBC leaders News : मुख्यमंत्र्यांपासून ते घनसावंगीच्या टोपेंपर्यंत सगळेच पडले पाहिजेत, ओबीसी नेते कडाडले !

ओबीसी समाजाच्या आरक्षणाबाबत बोलाविण्यात आलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री, अजित पवार, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार, छगन भुजबळ, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, बाळासाहेब आंबेडकर यासारखे 45 नेते आणि अधिकारी राहणार उपस्थित राहणार आहेत. यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचाही समावेश असणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ही बैठक होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com