OBC leaders News : मुख्यमंत्र्यांपासून ते घनसावंगीच्या टोपेंपर्यंत सगळेच पडले पाहिजेत, ओबीसी नेते कडाडले !

OBC Vs Maratha Reservation : बहुसंख्येने असलेल्या ओबीसी समाजाला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एक टक्का देखील पैसे मिळत नाहीत. महाराष्ट्रात एकही ओबीसी वसतीगृह नाही. मुख्यमंत्री 60 टक्के ओबीसींना डावलतात
Eknath Shinde- Rajesh Tope
Eknath Shinde- Rajesh TopeSarkarnama

Pune News : महाराष्ट्रात सध्या आरक्षणावरून जोरदार वातावरण तापले असून मराठा विरोधात ओबीसी असा संघर्ष पेटला आहे. या संघर्षात एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील तर दुसरीकडे ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके मैदानात उतरले आहेत.

मनोज जरांगे यांनी वेळ पडल्यास 288 उमेदवारांना पडण्याची तयारी दर्शवली आहे.याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना लक्ष्मण हाकेंनी देखील मुख्यमंत्र्यांपासून ते घनसांगवी चे आमदार राजेश टोपे यांच्यापर्यंत सर्व पडले पाहिजेत असं जाहीर वक्तव्य केलं आहे.

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी हाके म्हणाले, मंडल आयोगाच्या अंमलबजावणी महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. आपल्यावर बेरोजगारी आली म्हणजे ओबीसीतून आरक्षण मिळविणे ही भूमिका योग्य नाही.

तुम्ही ओबीसी झाले म्हणून गरीबी हटणार हे मराठा समाजाच्या तरुणांना सांगण्यात येत आहे, ते चुकीचं आहे. काही लोक संविधानाला आव्हान देण्याची भाषा करत आहेत ते योग्य नसल्याचे सांगत हाके यांनी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर कडक शब्दात टीका केली.

Eknath Shinde- Rajesh Tope
Maratha Reservation News : अशोक चव्हाण यांच्यावर भाजपचा विश्वास, म्हणूनच दोनवेळा जरांगेंच्या भेटीला पाठवले!

महाराष्ट्रातील नेते पाच वर्षे निवडणूक मूडमध्ये असतात त्यामुळे आरक्षणासारखे प्रश्न सुटत नाहीत. सध्या समाजव्यवस्था बिघडत आहे.आजही महाराष्ट्रातील असंख्य ओबीसी समाज सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.बहुसंख्येने असलेल्या ओबीसी (OBC) समाजाला राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये एक टक्का देखील पैसे मिळत नाहीत.महाराष्ट्रात एकही ओबीसी वसतीगृह नाही. सरकार कर्जात बुडालेल्या सहकारी साखर कारखान्यांना पैसे देते, मात्र ओबीसींना कोणतेही आर्थिक सहाय्य करत नसल्याचे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे यांच्या बरोबरीने राज्यात इतर ठिकाणी अनेक ओबीसी समाजाची आंदोलने झाली. मात्र राज्य सरकाराने याकडे कोणतेही लक्ष दिले नाही, म्हणून आम्ही ओबीसींच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी वडीगोद्रीत आंदोलन केले.आतापर्यंत धनगर समाजाचा एकही खासदार निवडून गेलेला नाही. प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे. त्यातून सामाजिक समतोल दाखला जाईल, असेही हाके म्हणाले.

Eknath Shinde- Rajesh Tope
Maratha Vs OBC : मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार! 'आम्हीच शांत का बसावं', मनोज जरांगे पाटलांचा इशारा

मनोज जरांगे पाटील यांनी 288 उमदेवार पडायचे ठरवले आहे.त्यांना शुभेच्छा . जर राज्याचे हित यामधून होत असेल तर मुख्यमंत्र्यांपासून टोपेंपर्यंत सगळ्यांना पाडले पाहिजे असं हाके म्हणाले. मी अद्याप कोणतीही राजकीय भूमिका घेतलेली नाही. पण ओबीसी आंदोलन सोडवण्यासाठी राज्य सरकारने पंकजा मुंडे (Pankaja Munde), धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अतुल सावे असे ओबीसीच नेते का पाठवले.

बारा कोटी जनतेचे प्रतिनिधित्व करणारे मुख्यमंत्री का येत नाही, यावरूनच मुख्यमंत्री जातीवादी असल्याचे दिसते, असा आरोप त्यांनी केला. साठ टक्के सामाजिक वाटा असलेल्या ओबीसींची बाजू मांडण्याची तुम्ही मराठा समाजाची बाजू कशी मांडतात हाच माझा प्रश्न असल्याचेही हाके म्हणाले.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com