Eknath Shinde Group : शिंदे गटाची डोकेदुखी वाढणार; मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

Shivsena News : या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच हे राजीनामे पाठविले आहेत
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Politic's : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातही आता नाराजी आणि रुसवे फुगवे सुरू झाल आहेत. त्यातूनच मुंबईतील काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले असल्याचे पुढे आले आहे. आता मुख्यमंत्री शिंदे यावर कसा तोडगा काढतात, हे पाहणे महत्वाचे आहे. (Office bearers of the Shinde group in Mumbai submitted their resignations)

मुंबईतील मालाड, कांदिवली, चारकोप या भागातील शिंदे (Eknath shinde) गटाच्या शिवसेनेतील (Shivsena)पदाधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलेले आहे. आगामी काळात मुंबई महापालिका व इतर निवडणुका होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यातच पक्षातील हे रुसवे फुगवे आणि नाराजी शिंदे गटाला परवडणारी नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Solapur Politic's : हैदराबादला गेलेले ५२ सरपंच-उपसरपंच म्हणजे हौशे, गौसे; बीआरएस प्रवेशाची भाजप आमदाराने उडवली टिंगल

माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचा आरोप या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देताना केला आहे. या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच हे राजीनामे पाठविले आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री या वादावर काय निर्णय घेतात,याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष आहे.

Eknath Shinde
Bhadgaon Girl Murder Case : उज्ज्वल निकम यांनी मान्य केली भाजप आमदारांची विनंती; 'या' प्रकरणात मांडणार सरकारी पक्षाची बाजू

यासंदर्भात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मालाड विभागाच्या संघटकाने सांगितले की, आम्ही मालाडमध्ये शिवसेना पक्षवाढीचे काम सुरुवातीपासून करत आहे. पण सध्या मालाड, कांदिवली आणि चारकोप विभागात जे प्रकार सुरू आहेत. पदाधिकाऱ्यांना पदावरून कारण न देता काढले जात आहे. त्यामुळे पक्षातील लोक संतापले आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिले आहेत.

Eknath Shinde
Maharashtra Congress march : काँग्रेसची १६ ऑगस्टनंतर राज्यात पदयात्रा; या नेत्यांवर असणार महत्वपूर्ण जबाबदारी

दरम्यान, लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने मुंबईतच पक्षामध्ये मतभेद उफाळल्याने शिंदे गटाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. एकीकडे राज्यात अपात्रतेसंदर्भातील सुनावणी लवकरच सुरू होणार आहे. दुसरीकडे पक्षात स्थानिक नेत्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू आहे, त्यामुळे मुख्यमंत्री यावर कसा तोडगा काढतात, हे बघावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com