Tukaram Mundhe : तडकाफडकी बदलीनंतर तुकाराम मुंढें पहिल्यांदाच ट्विटरवर झाले व्यक्त; म्हणाले...

Tukaram Mundhe News : आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची दोनच महिन्यात बदली झाली.
Tukaram Mundhe News
Tukaram Mundhe NewsSarkarnama

Tukaram Mundhe News : आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची दोनच महिन्यात बदली झाली. त्यामुळे राज्यभरात चांगलीच चर्चा झाली. मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीमुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यामुळे मुंढेंच्या बदलीसाठी जबाबदार कोण अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आता तुकाराम मुंडे यांनी ट्वीट केले आहे.

आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान या पदावर तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर या विभागाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी राज्याच्या विविध भागात दौरे केले. मुंढे यांनी त्यांच्या शैलीत या विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मुंढे यांनी या विभागाची सूत्रे हाती घेऊन दोन महिने पूर्ण होण्यापूर्वीच २९ नोव्हेंबरला त्यांना या पदावरुन कार्यमुक्त होण्याचे आदेश देण्यात आले, त्याची एकच चर्चा राज्यभारात रंगली आहे.

Tukaram Mundhe News
मुंढे अजुनही वेटिंगवरच; मुख्यमंत्री शिंदेंनी आणले, मंत्री सावंत अन् डॉक्टरांच्या लॉबिने घालवले?

त्यामुळे पुन्हा एकदा मुंढे चर्चेच्या केंद्र स्थानी आले आहेत. मुंढे यांनी एक सूचक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी दोन ओळी पोस्ट केल्या आहेत. ते म्हणाले, आयुष्यात नेहमीच तुमच्या अपेक्षेप्रमाणे, त्या मार्गाने घटना घडत नसतात, असा आशय असणाऱ्या ओळी मुंढे यांनी इंग्रजीतून ट्विट केल्या आहेत. मुंढे यांच्याकडे अद्याप नवा पदभार देण्यात आलेला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार आल्यानंतर मुंढे यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी आल्यानंतर त्यांनी राज्यभरात भेटीगाठींचा धडाका लावला होता. राज्यभरात त्यांनी भेटी देत अधिकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. बेजबाबदारपणे वागतील त्या अधिकाऱ्यांना मुंढेंनी कारवाईचा इशारा दिला होता. बायोमेट्रिक हजेरी, मुख्यालयी वास्तव्यास असणे, खासगी रुग्णालयातील प्रॅक्टिस बंद करण्याबाबत त्यांनी आदेश दिले होते.

Tukaram Mundhe News
Kirit Somaiya news: सोमय्यांचा 'तो' दावा प्रदुषण मंडळाने खोडून काढला; परबांना दिलासा

तसेच कोरोना काळातील औषधांच्या खरेदी संदर्भात देखील मुंढे यांनी माहिती मागवल्याची बातमी समोर आली होती. यानंतर काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोग्य मंत्र्यांकडे मुंढे यांची तक्रार केल्याच्या चर्चा होत्या. मुंढे यांना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी देखील काही सूचना केल्याची चर्चा रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com