मुंढे अजुनही वेटिंगवरच; मुख्यमंत्री शिंदेंनी आणले, मंत्री सावंत अन् डॉक्टरांच्या लॉबिने घालवले?

Tukaram Mundhe News : आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची दोनच महिन्यात बदली झाली.
Tukaram Mundhe, Eknath Shinde News
Tukaram Mundhe, Eknath Shinde NewsSarkarnama

Tukaram Mundhe News : आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची दोनच महिन्यात बदली झाली. त्यामुळे राज्यभरात चांगलीच चर्चा झाली. मुंढे यांच्या तडकाफडकी बदलीमुळे नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. त्यामुळे मुंढेंच्या बदलीसाठी जबाबदार कोण अशी चर्चा सुरु झाली आहे.

आरोग्य विभागामध्ये चांगले काम व्हावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुंढे यांची नियुक्ती केली होती. मात्र, मुंढे यांचे नाव येताच आरोग्य क्षेत्रातील अधिकारी डॉक्टरांनी विरोध करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मुंढे कितीदिवस राहतील याबद्दल शंकाच होती. त्यांची नियुक्ती होताच त्यांच्या बदलीसाठी लॉबिंग सुरु झाले होते.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मागच्या महायुती सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून काम केल्याने त्यांना या खात्याबद्दल अधिक कनवळा आहे. तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी खात्याची आरोग्य सेवा सामान्यांपर्यंत पोचविल या भावनेने त्यांची आरोग्य अभियान आयुक्त म्हणून नेमणूक केली होती, अशी सूत्राची माहिती आहे.

मात्र, रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी अगोदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्याचे काम हाती घेतले. यासाठी रात्रीच्या वेळी अचानक आरोग्य संस्थांना भेटीचे सत्र सुरु झाले. प्रतिनियुक्त्या बंद करा असे एक ना अनेक आदेश त्यांनी दिले. त्यामुळे उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या आणि कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला सोयीनुसार चक्कर मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.

दरम्यान, खात्यात मंत्र्यांनाही तुकाराम मुंढे नको वाटू लागले. मुंढे यांनी आरोग्य विभागातील अनेक अनियमिततांची चौकशी लावल्याने वरिष्ठ अधिकऱ्यांची लॉबी एकवटली होती. कोरोना संसर्ग आजाराच्या काळात राज्यभर खरेदीच्या नावाखाली कोट्यावढी रुयांची उधळपट्टी करण्यात आली. बाजारभावपेक्षा दहापट किमतीला वस्तू आणि अनावश्यक वस्तूंच्या खरेदीत कोट्यावढी रुपये खरच करण्यात, आल्याचा आरोप होतो. राज्यभर असे प्रकार घडले आहेत. तुकाराम मुंढे रुजू होताच त्यांनी हा विषय एजेंड्यावर घेत चौकशा लावल्या होत्या.

अनेक ठिकाणी चौकशांमध्ये अधिकारी दोषी आढळले, असल्याची माहिती आहे. त्यामुळे या अहवालवर मुंढे कारवाया करणार याची धास्ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना लागली होती. त्यामुळे राज्यभरातील लॉबी एकवटली होती. दरम्यान, मुंढे असतील तर तुमची मर्जी पूर्ण करण्यात अडचणी येतील असे या लॉबीने मंत्र्यांना पटवून दिल्याची चर्चा आहे. तसे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जवळचे आहेत. त्यामुळे सावंत यांनी मुंढे यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांकडे प्रतिष्ठा पणाला लावल्याचे सांगितले जाते. त्यामुळे अखेर मुंढे यांची दोनच महिन्यात बदली झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com