Sharad Pawar News : फडणवीसांचा गौप्यस्फोट पवारांनी नाकारला

Devendra Fadnavis : पहाटेच्या शपथविधीबाबत राज्यात उत्सुकता ताणलेलीच
Sharad Pawar, Devendra Fadanavis
Sharad Pawar, Devendra FadanavisSarkarnama

Sharad Pawar and Devendra Fadnavis : भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी २३ नोव्हेंबर २०१९ रोजी पहाटे अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या पहाटेच्या शपथविधीने राज्यासह देशात राजकीय भूकंप झाला होता.

या प्रकरणी दररोज नवनवीन मुद्दे बाहेर येऊन चर्चांना उधाण आले आहे. मात्र या पहाटेच्या शपथविधीमागील उलगडा अद्याप काही होताना दिसत नाही. परिणामी याचे कुतूहल अजूनही राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांत आहे.

Sharad Pawar, Devendra Fadanavis
Devendra Fadnavis : पहाटेचा शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच; फडणवीसांच्या दाव्याने राज्यात खळबळ

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज (ता. १३) पहाटेच्या शपथविधीमागील एक मोठा गौप्यस्फोट केला.

भाजप आणि राष्ट्रवादीच्या तो शपथविधी हा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी चर्चा करूनच केला होता, असा दावा फडणवीसांनी केला. तसेच खाते वाटप आणि महामंडळांच्या वाटपाबाबतही पवारांशी चर्चा केल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले. तसेच या प्रकरणावर अजित पवार (Ajit Pawar) बोलले तर मी सविस्तरपणे सांगेन, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या या दाव्यामुळे राज्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. दरम्यान, पहाटेच्या शपथविधीबाबत आपल्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचे राष्ट्रवादीचे शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले आहे.

Sharad Pawar, Devendra Fadanavis
Bacchu Kadu : भविष्यवाणी करता आली, तर बघतो; असं का म्हणाले बच्चू कडू?

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या गेल्या. मात्र फडणवीसांनी केलेल्या विधानाचे शरद पवार यांनी खंडण केले आहे. शरद पवार म्हणाले, "मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत माणूस आहेत. सभ्य माणूस आहेत. ते असत्याचा आधार घेऊन अशी वक्तव्य करतील, असं मला कधी वाटलं नाही."

Sharad Pawar, Devendra Fadanavis
Patan : ठाकरे सेनेच्या महाप्रबोधन यात्रेचा मायनस शून्य टक्के परिणाम होईल : देसाई

फडणवीसांनी कोणत्या अधारावर विधान केले असेल, असे शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारण्यात आले. त्यावर पवार म्हणाले, "या प्रश्नाचे उत्तर फडणवीसांनाच विचारा."

दरम्यान, आज पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी विधान करून अजित पवार यांच्या कोर्टात चेंडू टोलावला होता. तो चेंडू शरद पवारांनी पुन्हा फडणवीसांच्या कोर्टात परतवला. आजच्या फडणवीस आणि पवार यांच्या वक्तव्यांवरून पहाटेच्या शपथविधीमागे नेमका कोणाचा हात, याची उत्सुकता ताणली गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com