पुणे : एकेकाळी शिवसेनेने (Shivsena) ज्यांच्याशी दोन हात करून मुंबईतील त्यांचे वर्चस्व मोडीत काढले. त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (CPI) पदाधिकाऱ्यांनी आज अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या (MVA) उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला.
‘सीपीआय’मुंबईचे सचिव मिलींद रानडे व वरिष्ठ नेते प्रकाश रेड्डी, प्रकाश नार्वेकर, बाबा सावंत यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ‘सीपीआय’चा पाठिंबा असेल, असे जाहीर केले.अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक येत्या तीन नोव्हेंबरला होणार आहे. त्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची शेवटीची तारीख आहे. उमेदवार निवडीवरून राजकीय घडामोडींना वेग आला असताना ‘सीपीआय’ने यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.
मुंबईत शिवसेना आणि कम्युनिस्ट असा जुना राजकीय संघर्ष आहे. सत्तरच्या दशकात या दोन संघटनांमधील वाद विकोपाला गेला होता. १९८० च्या नंतर कम्युनिस्टांचा प्रभाव कमी होऊन शिवसेनेचा प्रभाव वाढत गेला. मात्र, शिवसेना व कम्युनिस्टांमध्ये कधीच सख्य नव्हते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कम्युनिस्टांना शेवटपर्यंत विरोध केला होता. या साऱ्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना भेटून कम्युनिस्टांनी दिलेला पाठिंबा महत्वपूर्ण आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने अद्याप मंजूर केला नाही. त्यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे या पोटनिवडणुकीत त्या उमेदवार असतील का याबाबत अद्याप संभ्रम आहे. तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच छोट्या-मोठ्या गटांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार लटके यांच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात आता ‘सीपीआय’ची भर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.