Mumbai News, 07 May : भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर देशभरातून भारतीय सैन्यांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
मात्र, अशातच आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील अतिरेक्यांना शोधून काढण्यात केंद्र सरकारला अद्याप यश आलेलं नाही. दहशतवाद्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहील, असा धडा शिकवणं गरजेचं होतं.
अशावेळी युद्ध करणे किंवा मॉकड्रील आणि एअरस्ट्राईक अशा गोष्टी फायद्याच्या नाहीत, असं राज यांनी म्हटलं आहे. शिवाय पाकिस्तान आधीच बरबाद झालेला देश असून त्याला आणखी काय बरबाद करणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तर यावेळी अमेरिकेने दहशतवादी हल्ल्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं याची आठवण देखील करून दिली.
ते म्हणाले, अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले तेव्हा अमेरिकेने त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारलं. त्यामुळे अशा हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते, त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातीलच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणं योग्य नसल्याचंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
त्यामुळे राज ठाकरे हे सध्या केंद्र सरकारने केलेल्या कारवाईवर समाधानी नसल्याचं दिसत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणी सुरक्षा का नव्हती? हा महत्त्वाचा प्रश्न असून हल्लेखोरांना गरजेचं आहे. एअर स्ट्राईक आणि युद्ध करणं हा पर्याय नसल्याचंही राज ठाकरे यांनी म्हटलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.