Sharad Pawar : 'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती प्रत्येक खासदाराला देण्यावरून काँग्रेस अन् शरद पवारांमध्ये मतभेद; नेमकं प्रकरण काय?

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची संपूर्ण देशाला माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलवावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
Narendra Modi, Sharad Pawar, Rahul Gandhi
Narendra Modi, Sharad Pawar, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 14 May : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'ची संपूर्ण देशाला माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष सत्र बोलवावं, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

मात्र, काँग्रेसच्या या भूमिकेवर विरोधी पक्षातील ज्येष्ठ आणि प्रमुख नेते शरद पवार यांनीच आक्षेप घेतला आहे. संसदेचं विशेष सत्र बोलावण्याची गरज नसून पंतप्रधानांनी प्रमुख पक्षातील काही प्रमुखांना बोलावून या ऑपरेशनबाबतची माहिती दिली तरी पुरेसं आहे, असं मत पवारांनी व्यक्त केलं आहे.

मात्र, पवारांच्या या वक्तव्यानंतरही काँग्रेसने आपल्या भूमिकेवर ठाम राहत ऑपरेशन सिंदूरमध्ये काय काय घडलं? हे प्रत्येक खासदाराला जाणून घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. शिवाय देशाचं सैन्य हे कुठल्या पक्षाचे नव्हे तर ते संपूर्ण देशाचं आहे, हे सरकारने लक्षात ठेवावं असंही काँग्रेसने म्हटलं आहे.

Narendra Modi, Sharad Pawar, Rahul Gandhi
India Pakistan Ceasefire : भाजपने तिरंगा नव्हे ट्रम्प यात्रा भरवाव्यात..., ठाकरे गटाचा हल्लाबोल

संसद हेच देशाचं सर्वोच्च व्यासपीठ असून सरकारकडून एखाद्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना माहिती देण्याऐवजी प्रत्येक खासदाराला ऑपरेशन सिंदूरची सखोल माहिती दिली पाहिजे, कारण खासदारच लोकांचे प्रतिनिधित्व करतात, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे.

तसंच यावेळी त्यांनी देशावर मोठं संकट आले असताना विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. सरकारने विरोधी पक्षांसोबत दोन बैठका घेतल्या. मात्र या बैठकीत पंतप्रधान गैरहजर राहिले हे दुर्दैवी आहे. जनतेच खरं प्रतिनिधित्व देशातील 542 खासदार करतात.

Narendra Modi, Sharad Pawar, Rahul Gandhi
Operation Sindoor Survey : ऑपरेशन सिंदूर, युद्धविरामाच्या निर्णयावर मोठा सर्व्हे आला समोर, मोदी सरकारवर जनता खूश की नाराज?

त्यामुळे त्यांच्या शंकेचे निरसन झालेच पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. शिवाय शरद पवारांचा सूर वेगळा असला तरी पंतप्रधानांनी स्वतः सर्व माहिती द्यावी, अशीच त्यांची अपेक्षा आहे, असंही मुत्तेमवार यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com