फडणवीसांनी नाना पटोलेंसाठी काँग्रेसला दिला 'हा' सल्ला!

नाना पटोले यांच्या विरोधात भाजप राज्यभर आंदोलन करत आहे.
Nana Patole, Devendra Fadnavis
Nana Patole, Devendra Fadnavissarkarnama

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी 'मी मोदी यांना मारू शकतो', 'शिवी देऊ शकतो' असे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठले होते. यानंतर पटोले यांनी आपण एका गावगुंड मोदीबाबत बोलत होतो असा दावा केला होता. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली.

फडणवीस मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी फडणवीस यांना पत्रकारांनी नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, नाना पटोले यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांना चांगल्या डॅाक्टरांकडे दाखवण्याची गरज, असल्याचे सांगत फडणवीस यांनी पटोले यांचा समाचार घेतला. नाचता येईना अंगण वाकडे अशी अवस्था उर्जामंत्री नितीन राऊत यांची झाली आहे. राज्यात जेवढा भ्रष्टाचार सुरु आहे तो जरी थांबला तरी वीज बिले वसूल करण्याची गरज पडणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

Nana Patole, Devendra Fadnavis
बाळासाहेबांनी शिवसेना सडत ठेवली का?

पोलिसांनी पटोले यांनी सांगितलेल्या गावगुंडाला अटक केली आहे. मात्र याबाबत बोलताना पटोले यांनी पुन्हा एकदा नवा वाद ओढवून घेतला आहे. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते असे ते म्हणाले आहेत. यावरुन भाजपकडून राज्यभरात आंदोलने केली जात आहे. नागपुरातही भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. नाना पटोलेंना वेड्यांच्या इस्पितळात भरती करा यासाठी सोनिया गांधींना पत्र लिहिणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

दरम्यान, या वेळी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, सोयीचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर त्यांच्या भाषणात पाहायला मिळाला. शिवसेना २५ वर्ष युतीत सडली असो ते म्हणत आहेत. मात्र २०१२ पर्यंत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता. त्यांच्या हयातीत त्यांनी युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेबांच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवत आहात का, असा सवाल फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

Nana Patole, Devendra Fadnavis
चंद्रकांतदादा म्हणतात, आम्ही गोट्या खेळत नाही, जुळवाजुळव करतोय!

भाजपसोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले असे तुमचे म्हणणे आहे का असा सवाल आमच्या मनात येतो. भाजपच्या सोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचा पक्ष होते. आता भाजप सोडल्यावर चौथ्या क्रमंकावर गेले. मग कोणासोबत सडले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात तेच ते मुद्दे आहेत. त्यांचे भाषण आता शिवसैनिकांना पाट झाले असेल. राम जन्मभूमिच्या आंदोलनात तुमचे कोण होते? भाषणाच्या पलिकडे तुमचे हिंदुत्व काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि आनंद दिघेंनी संघर्ष केला. तुमचे हिंदुत्व हे कागदावरचे हिंदुत्व आहे. हिंदुत्व जगावे लागते, असे फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com