Raj Thackeray Sabha : महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न अन्‌ आपले नेते मिंधे, लाचार झालेत; राज ठाकरेंचा घाणाघात

MNS Co-operative Sector News : आपल्या जमिनी काढून घेण्याची एक प्रकारची सहकार चळवळ महाराष्ट्राच्या विरोधात चालवली जात आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : महाराष्ट्रातील सर्व बाहेर नेण्यात येत आहेत. बाहेरचे लोक महाराष्ट्रात आपल्याच जमिनी किरकोळ किमतीत विकत घेत आहेत. आपल्या जमिनी काढून घेण्याची एक प्रकारची सहकार चळवळ महाराष्ट्राच्या विरोधात चालवली जात आहे. महाराष्ट्र एकसंघ राहू नये, यासाठी बाहेरच्या लोकांचे प्रयत्न सुरू आहेत आणि आपले नेते मिंधे, लाचार व पैशाने वेडे झाले आहेत, असा घाणाघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर केला. (Outsiders are trying to break Maharashtra : Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सहकार मेळावा नेरुळ येथे झाला. त्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला सावध राहण्याचा सल्ला देत राजकारण्यांवर हल्लाबोल केला. या विभागाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांनी या मेळाव्यासाठी पुढाकार घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raj Thackeray
Thackeray Group News : ठाकरेंना बीडमध्ये पुन्हा धक्का; अंधारेंवर आरोप, सहसंपर्कप्रमुखांची शिंदेसेना प्रवेशाची घोषणा

राज ठाकरे म्हणाले की, आपल्याकडील महानंद डेअरी अमूल गिळकृंत करते की काय, अशी सध्याची परिस्थिती आहे. सहकार क्षेत्र सांभाळण्यासाठी महाराष्ट्रात सक्षम लोक आहेत. मात्र, इतिहासाकडे दुर्लक्ष करून वर्तमानाचे भान ठेवणार नसाल तर आपल्या हाती काहीही राहणार नाही.

मराठवाड्यात अनुकूल परिस्थिती नसतानाही उसाचे पीक घेतले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर येत्या ५० वर्षांत मराठवाड्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आपल्याकडील पुढाऱ्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नाही. मराठवाड्याचे वाळवंट झाले तर ती स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी ४०० ते ५०० वर्षे लागतील, अशी भीतीही राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

Raj Thackeray
Ram Mandir News : सोलापूरकरांसाठी अभिमानाची गोष्ट... श्रीरामांच्या मूर्तीला सोलापुरात विणलेले वस्त्र घालणार...

ते म्हणाले की, आज आम्ही आपपासांत भांडतो आहोत. जाती-धर्मांमध्ये भांडणे लावली जात आहेत. हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये, यासाठी बाहेरच्या लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. हे आमच्या लोकांच्या ध्यानात येत नाही. महाराष्ट्राचे चांगले आहे, ते बाहेर नेले जात आहे. बाहेर येत नसेल ते उद्‌ध्वस्त केले जात आहे.

महाराष्ट्र विरोधातील ही सहकार चळवळ तुम्ही ओळखली पाहिजे. आपल्याकडील नेते लाचार, मिंधे झाले आहेत. पैशाने वेडे झाले आहेत. त्यांना सत्व कळत नाही. हे नेते नुसत्या पक्षांतरांच्या उड्या मारत आहेत. यांना घरचे लोकही आज कुठल्या पक्षात आहात, असे विचारत असतील. त्यांनी त्यांचा स्वाभिमान गहाण टाकला आहे. पण, तुम्ही टाकू नका. तुमच्यासह सर्वांनी सतर्क राहावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

Raj Thackeray
Aditya Thackeray: शंभूराज देसाईंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरणार; 'मी येतोय'..., आदित्य ठाकरे..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com