Mohan Bhagwat : आता भारताची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे...; दहशतवादी हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

Mohan Bhagwat Statement : "पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मारलं पण असं हिंदू कधीच करत नाहीत. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जे केलं त्या घटनेनं आम्हाला दुःख झालं आहे. शिवाय शत्रुत्व आणि वैर हा आपला स्वभाव नाही, पण नुकसान सहन करणं देखील आपला स्वभाव नाही."
Mohan Bhagwat
Mohan BhagwatSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 25 : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दहशतवाद्यांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगला धडा शिकवा, अशी भावना प्रत्येक भारतीयाकडून व्यक्त केली जात आहे.

अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. आपला देश शक्तिशाली आहे हे दाखवून देण्याची वेळ आली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

गुरुवारी मुंबई येथे झालेल्या एका पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले, "आपला देश शक्तिशाली आहे हे आता दाखवण्याची वेळ आली आहे. ही लढाई पंथांमधली नाही तर ती धर्म आणि अधर्मातली आहे. काश्मीरमध्ये कट्टरपंथीयांनी जे केलं त्याचा सगळे निषेध करत आहेत.", असं त्यांनी म्हटलं.

Mohan Bhagwat
Simla Agreement : पाकिस्तानने 'सिमला करार' रद्द केल्यास भारताचं नुकसान होणार? नेमका काय आहे हा करार? जाणून घ्या

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी रावणाचं उदाहरण दिलं. ते म्हणाले, "रावण हा भगवान शिव यांचा भक्त होता पण तो अशा कारवायांनी वेढला होता की, ज्यांचे स्पष्टीकरण देऊन निराकरण होऊ शकत नव्हते. त्यामुळे प्रभू रामचंद्रांना त्याचा वध करावा लागला.

तर असे काही लोक आहेत, ज्यांना केवळ समजावून सांगून काहीही होणार नाही. अशा लोकांना धडाच शिकवला पाहिजे आणि मला आशा आहे की हे लवकरच साध्य होईल, असं म्हणत त्यांनी भारताने पाकिस्तानला चांगला धडा शिकवावा अशी अप्रत्यक्षपणे भावना बोलून दाखवली.

Mohan Bhagwat
Pahalgam Terror Attack : सांगितलं होतं घरात घुसून मारणार! भारताचा दहशतवाद्यांना करारा जवाब; एकाचं घरं बॉम्बने उडवलं तर दुसऱ्याचं...

तसंच यावेळी त्यांनी पहलगाममध्ये लोकांचा धर्म विचारून मारलं पण असं हिंदू कधीच करत नाहीत. काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी जे केलं त्या घटनेनं आम्हाला दुःख झालं आहे. शिवाय शत्रुत्व आणि वैर हा आपला स्वभाव नाही, पण नुकसान सहन करणं देखील आपला स्वभाव नाही. त्यामुळे तुमच्याकडे शक्ती असेल तर तुम्ही ती दाखवली पाहिजे आणि ती वेळ आता आली आहे, असं भागवत यांनी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com