Nana Patole On Pahalgam attack : पहलगाम यथील दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्याच्या परिस्थितीत इंदिरा गांधी असत्या तर आतापर्यंत पाकिस्तानचे चार तुकडे केले असते, असं वक्तव्य पटोले यांनी केलं आहे.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला करत 26 भारतीय पर्यटकांची हत्या केली. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारत सरकारने या हल्ल्याचा बदला घ्यावा, अशी भावना प्रत्येक भारतीयाची आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी कोणालाही सोडणार नाही, असं म्हणत हल्लेखोरांना कठोर शिक्षा करणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारने पाकिस्तान विरोधात ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. अशातच आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पटोले (Nana Patole) म्हणाले, सध्याच्या परिस्थितीत इंदिरा गांधी असत्या तर त्यांनी पाकिस्तानचे आतापर्यंत चार तुकडे करून टाकले असते. बलुचिस्तान हा वेगळा देश व्हावा, अशी तिथल्या लोकांची मागणी आहे. पर्यटकांवर केलेला हल्ला हा पाकिस्तानच्या आदेशांने केल्याचं सिद्ध झालं आहे. तरीही देशातलं सरकार का शांत आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्ही सध्याच्या परिस्थितीत केंद्र सरकारसोबत असल्याचं स्पष्ट केलं आहे. पाकिस्तानला जशास तसं उत्तर द्यावं, ही आमच्या नेत्यांची भूमिका आहे. मात्र, केंद्राने जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही, असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तर हल्ल्यानंतर प्रधानमंत्री ज्या प्रकारे हास्यकल्लोळात आहेत ती भूमिका या देशातील नागरिकांना नं पचणारी असं म्हणत त्यांनी मोदींवर टीका केली.
दरम्यान, पटोले यांनी इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले असते, असं म्हटलं आहे. मात्र, नुकतंच ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात पंतप्रधान मोदी आता राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून जाता जाता ते उरलेल्या पाकिस्तानचे चार तुकडे करून इतिहासात अमर होतील.
त्यामुळे मोदी यांच्या पाठीशी सगळ्यांनी उभे राहायला हवे, असं आवाहन केलं होतं. शिवाय याचवेळी अग्रलेखातून विरोधकांचे कान टोचले होते. सर्वपक्षीय बैठकीत मोदी व त्यांच्या भूमिकांना सढळ हस्ते पाठिंबा दिल्यावर आता स्वतंत्र अधिवेशन घेऊन काय साध्य करणार?
असा सवाल करत मोदी यांनी पाकड्यांना धडा शिकवण्यासाठीचे अधिकार भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यामुळे कश्मीरचे काय? पाकिस्तानला धडा शिकवणार काय? हे प्रश्न मोदींना विचारण्याचा मूर्खपणा विरोधकांनी करू नये, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे काँग्रेसवर निशाणा साधला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.