Sanjay Raut: ...तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते, राऊतांचं मोठं वक्तव्य

Sanjay Raut On BJP: "ज्या पक्षाने मला सर्वकाही दिलं त्या पक्षासाठी मी सदैव लढत राहणार. मी पळून जाणार नाही. पक्षासाठी मरायलाही तयार आहे. आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो. माझा डावा हात काम करत नाही. पण या गोष्टीचे मी कधीही भांडवल केले नाही."
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election 2024: भारतीय जनता पक्षाने दिलेला शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे 2019 मध्येच मुख्यमंत्री झाले असते, असा असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच आपण नेहमी शिवसेना पक्षासाठी लढत राहणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, "ज्या पक्षाने मला सर्वकाही दिलं त्या पक्षासाठी मी सदैव लढत राहणार. मी पळून जाणार नाही. पक्षासाठी मरायलाही तयार आहे. आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो. माझा डावा हात काम करत नाही. पण या गोष्टीचे मी कधीही भांडवल केले नाही. भाजप म्हणते 2014 नंतर भारत स्वतंत्र झाला. भाजपने शब्द पाळला असता तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) 2019 सालीच मुख्यमंत्री झाले असते."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदींचा चेहरा काळवंडला आहे

या मुलाखतीत बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत, शिवाय ते तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत येणार, अशी हवा असली तरी त्याबद्दल कोणालाही खात्री नाही. स्वत: पंतप्रधान मोदीदेखील भाजपच्या विजयाची खात्री देऊ शकत नाहीत, असं राऊत म्हणाले. तर मोदींचा चेहरा काळवंडला आहे. अमित शहा यांची दाढीही जळाल्यासारखी वाटत आहे. अमित शहा आत्मविश्वासाने जिंकण्याची भाषा करत आहेत. परंतू घाबरलेल्या माणसाकडेच अतीआत्मविश्वास असतो. आमचे एकनाथ शिंदेच बघा, खरी शिवसेना माझीच असे सांगत आहेत. शिवसेना जन्माला आली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत खेळत होते, असा टोला त्यांनी भाजपसह शिंदेंना लगावला.

Sanjay Raut, Eknath Shinde
Manoj Jarange Patil News : लोकसभेच्या निकालादिवशीच जरांगे उपसणार पुन्हा आंदोलनाचं हत्यार

तर यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी (MVA) राज्यातील 30 ते 35 जागा जिंकू शकत असा विश्वास व्यक्त केला. राऊत म्हणाले, पुन्हा सत्तेत येण्यासाठी पंतप्रधान मोदी जागा कुठून आणणार? आम्ही राज्यात 30 ते 35 जागा जिंकणार आहोत. तर इंडिया आघाडी दशात 300 जागा जिंकेल. त्यामुळे आता मोदी आम्हाला मजबूत विरोधी पक्षनेते म्हणून समोर हवे आहेत, असंही राऊत म्हणाले. तसंच बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी देशात मोदींविरोधात रान उठवलं असतं, असा दावाही राऊतांनी यावेळी केला.

(Edited By Jagdish Patil)

Sanjay Raut, Eknath Shinde
Shirdi Lok Sabha Constituency : 'वंचित'मुळे दोन्ही शिवसेना टेन्शनमध्ये; पैजांचा भाव वाढला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com