Lok Sabha Election 2024 : पालघरच्या जागेवरून पडली ठिणगी; महायुतीत होणार घमासान

Rajendra Gavit Criticized Hitendra Thakur Bahujan Vikas Aghadi : महायुतीत लोकसभेच्या जागेवरून पालघरमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
Rajendra Gavit, Hitendra Thakur
Rajendra Gavit, Hitendra Thakur Sarkarnama
Published on
Updated on

Palghar LokSabha Constituency :

महाराष्ट्रभर महायुतीच्या 15 घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांचे समन्वय मेळावे आयोजिले आहेत. तसाच मेळावा पालघर येथे उद्या, रविवारी (ता. १४ जानेवारी) आयोजिला आहे. या मेळाव्यासंबंधी माहिती देण्यासाठी म्हणून पालघर जिल्ह्यातील महायुतीच्या 15 घटकपक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित पत्रकारपरिषद पालघर येथे आयोजिली होती.

पत्रकारपरिषदेला महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या सरचिटणीस राणी द्विवेदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत, पालघर लोकसभा समन्वयक मनोज गरोडा, नरेंद्र पाटील, तर शिंदे शिवसेना गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे, वसंत चव्हाण, राजेश शहा, खासदार राजेंद्र गावित, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार आनंद ठाकूर, आरपीआयचे जाधव आदी उपस्थित होते.

बविआ हा घटकपक्ष उपस्थित राहिला नव्हता. त्यावरून Shinde Group सेनेचे खासदार राजेंद्र गावित यांनी बविआवर टीका केल्याने पालघरच्या जगेवरून महायुतीत घमासान होण्याची चिन्हे दिसत आहेत.

Rajendra Gavit, Hitendra Thakur
Uddhav Thackeray : खासदार शिंदेंच्या मतदारसंघातून ठाकरेंची तोफ धडाडली; म्हणाले, 'कल्याण-डोंबिवली कुणाच्या बापाची...'

पालघर लोकसभा उमेदवाराची अधिकृत अशी घोषणा झालेली नाही. केंद्रीय व राज्यस्तरीय महायुतीकडून उमेदवार घोषित केला जाईल. शिंदे शिवसेना गटाच्या बोईसर येथे झालेल्या मेळाव्यात श्रीकांत शिंदे यांनी पालघर लोकसभेचे उमेदवार खासदार राजेंद्र गावित हेच राहतील, असे ठामपणे सेनेच्या सभेमध्ये जाहीर केले होते.

महायुतीने घेतलेल्या पत्रकारपरिषदेत भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस राणी द्विवेदी यांनी वरिष्ठ पातळीवर अजूनही उमेदवार ठरविलेला नाही, असे पत्रकारांना सांगितले. त्यामुळे शिंदे शिवसेना गटात एकच खळबळ उडाली आहे. पालघर जिंकायचे असेल तर, बविआला दुखवून चालणार नाही. हे भाजपला माहिती आहे. यामुळे भाजपने अजून तरी, आपले पत्ते ओपन केले नाहीत. पालघरच्या खासदारांनी बविआविरोधात हल्लाबोल केल्याने युतीत वितुष्ट येण्याची चिन्हे दिसत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीमध्ये बहुजन विकास आघाडी हा घटकपक्ष आहे. या पत्रकारपरिषदेला या पक्षाचा एकही प्रतिनिधी आला नाही. तसेच वसई-विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार व सर्व ग्रामपंचायत समिती बहुजन विकास आघाडीकडे असताना गेल्या पस्तीस वर्षांत वसई-विरारचा विकास केला नाही. पाण्याची समस्या, पावसाळ्यात पुराची समस्या, रस्त्यांची समस्या आणि आरोग्याची समस्या अशा अनेक समस्यांना तोंड येथील जनतेला द्यावे लागते, अशी टीका या पक्षाचे नाव न घेता खासदार राजेंद्र गावित यांनी या पत्रकारपरिषदेत केली.

राजेंद्र गावित यांच्या टीकेमुळे महायुतीतील घटकपक्षांचा एकमेकांमध्ये समन्वय नाही, तर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय कसा निर्माण करणार? असाही प्रश्न पत्रकारांनी केला. मात्र यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. येथील जनतेमध्ये महायुतीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

edited by sachin fulpagare

R...

Rajendra Gavit, Hitendra Thakur
Dr. Shrikant Shinde : देर आये दुरुस्त आये..! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com