Dr. Shrikant Shinde : देर आये दुरुस्त आये..! खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला...

Reaction on Uddhav Thackeray's dialogue tour : कल्याण लोकसभा मतदारसंघात टोलेबाजी.
Uddhav Thackeray, Dr. Shrikant Shinde
Uddhav Thackeray, Dr. Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

- शर्मिला वाळुंज

Dr. Shrikant Shinde : शिवसेना ही शिंदे यांचीच, या निकालानंतर प्रथमच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कल्याण लोकसभेच्या दौऱ्यावर येत आहेत. हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे. ठाकरे यांच्या संवाद दौऱ्यावर खासदार शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देताना ठाकरे यांना टोला लगावला आहे.

'देर आये दुरुस्त आये' असे म्हणत त्यांनी ठाकरे यांचे स्वागत केले आहे. हे सगळं आधीच केलं असत तर, असेही खासदार शिंदे म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज कल्याण लोकसभा मतदारसंघात संवाद दौरा आहे. या दौऱ्या दरम्यान उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, दिवा, कळवा, मुंब्रा परिसरातील शिवसैनिकांशी ते संवाद साधून या मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

Uddhav Thackeray, Dr. Shrikant Shinde
Kolhapur Politics : सतेज पाटील-महाडिक एकाच पोस्टरवर झळकले, कार्यकर्त्यांना बसला धक्का!

तसेच शिवसेनेच्या शाखांना देखील ते भेटी देणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील शिवसैनिकांसाठी हा संवाद दौरा महत्त्वाची भूमिका ठरणार आहे. पक्ष फुटीनंतर तसेच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालानंतर प्रथमच पक्षप्रमुख ठाकरे हे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी स्वतः उपस्थित राहणार आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यामुळे शिवसैनिकांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे. या निमित्ताने ठाकरे गटाकडून शहरात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आले आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) यांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघावर ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केल्याने यावर प्रतिक्रिया देताना खासदार शिंदे म्हणाले, त्यांचे खूप खूप स्वागत आहे.

तब्बल सात तास त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी दिलेले आहेत. कल्याण लोकसभेत कशा प्रकारचं काम झालेलं आहे, हे देखील ते पाहतील. देर आये दुरुस्त आये... हे सर्व आधी केलं असतं, तर या सात तासाच्या दौऱ्याची परिस्थिती वेगळी असती. त्यांचं स्वागत माझ्या मतदारसंघात मी करतोय असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले आहेत.

(Edited by Amol Sutar)

Uddhav Thackeray, Dr. Shrikant Shinde
PM Narendra Modi : यांची हिंमत पाहा, रोखला मोदी सरकारचा रथ...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com