Palghar Loksabha : नाराज राजेंद्र गावित युतीधर्म पाळणार? स्वतःच केला खुलासा

Rajendra Gavit : पालघर लोकसभा Palghar Loksabha निवडणुकीसाठी तिकीट नाकारले, हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे.' अशी भावना राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली.
Rajendra Gavit
Rajendra Gavitsarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : पालघर मतदारसंघ भाजपने BJP शिवसेनेकडून खेचून आणला. त्यात विद्यमान खासदार राजेंद्र गावीत यांचे तिकीट कापले गेले. भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजेंद्र गावीत यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.यावर राजेंद्र गावित काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गावित यांनी स्वतः यावर खुलास करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Rajendra Gavit
Sangli Loksabha : प्रकाश आंबेडकरांना आनंदराज आंबेडकरांचा धक्का, सांगलीच्या उमेदवाराबाबत घेतला मोठा निर्णय

पालघर लोकसभा Palghar Loksabha निवडणुकीसाठी तिकीट नाकारले, हा माझ्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक आणि स्वतःसाठी दुःखद निर्णय आहे.' अशी भावना राजेंद्र गावित यांनी व्यक्त केली. हे खरे असले तरी माझ्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. कार्यकर्त्यांचे मला फोन येत असून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. मला जरी तिकीट नाकारले गेले असली तरी सुद्धा महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या बाबात कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी दूर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. उमेदवाराला विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करूया असे आवाहन मी केले आहे, असे सांगत राजेंद्र गावित Rajendra gavit यांनी सांगत युतीधर्म पाळणार असल्याचे जाहीरच केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अवघ्या एक दिवस आधी भाजपने हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली. जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी रात्री पालघर येथे खासदार राजेंद्र गावित यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी गावितांचे समर्थक यांनी जोरदार घोषणाबाजी करून गावितांनाच तिकीट मिळाली पाहिजे, असा आग्रह धरला होता. मात्र रवींद्र चव्हाण यांनी त्यांची समजूत घालून गावितांचे महाराष्ट्रात चांगल्या ठिकाणी पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन दिले.

पालघर लोकसभा मतदारसंघात भारती कामडी ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. बविआने राजेंद्र पाटील यांना मैदानात उतरवले आहे. भाजपकडून हेमंत सावरा लढत आहेत त्यामुळे पालघरची निवडणूक ही तिरंगी होणार आहे. मात्र, राजेंद्र पाटील यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे बविआचे नेते काय निर्णय घेतात त्यावर ही निवडणूक तिरंगी होणार की नाही हे ठरणार आहे.

(Edited By Roshan More)

Rajendra Gavit
Eknath Shinde On Rahul Gandhi : राहुल गांधींना स्वत:च्या विजयाची खात्री नाही ते देशाची गॅरंटी काय देणार ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com