Palghar loksabha News : अर्ज भरताना हेमंत सावरांचे शक्तिप्रदर्शन; पण मुख्यमंत्र्यांसह खासदारांची दांडी

Hemant Savra विशेष म्हणजे डॉ. हेमंत सावरा यांचा अर्ज दाखल करताना प्रोटॉकॉलप्रमाणे मुख्यमंत्री-मुख्यमंत्री यांनी हजर राहणे अपेक्षित होते. मात्र त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली.
Palghar loksabha News
Palghar loksabha News Sarkarnama
Published on
Updated on

Virar News : उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वसंध्येला भाजपने विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट करत दिवंगत विष्णू सावरा यांचे सुपुत्र डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र या अनपेक्षित घोषणेमुळे भाजपसह शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे) कार्यकर्त्यांनाही धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवार मतचाचणीत डॉ. हेमंत सावरा यांचे नाव होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर डॉ. हेमंत सावरा यांच्या दाखल झालेल्या उमेदवारी अर्जादरम्यान पालकमंत्री रवींद्र चव्हाण काही वेळ हजर होते .

भाजपने मोठे शक्तिप्रदर्शन केले असले तरी राज्यात ठिकठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करताना असणारे राज्यातील मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवल्यानेअनेक तर्कवितर्क करण्यात येत होते. विशेष म्हणजे डॉ. हेमंत सावरा यांचा अर्ज दाखल करताना प्रोटॉकॉलप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजर राहणे अपेक्षित होते. मात्र त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने दिसून आली.

ऐन वेळी उमेदवारी गेल्याने राजेंद्र गावितही या वेळी उपस्थित राहिले नाहीत. पालघर लोकसभेसाठी महायुतीत शेवटपर्यंत सस्पेन्स राहिला होता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास एक दिवस बाकी असताना हि जागा भाजपला सोडल्याचे जाहीर झाले. परंतु उमेदवाराचे नाव मात्र, काल रात्री ९ वाजता जाहीर करण्यात आल्याने महायुतीत पालघरमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत होते.

Palghar loksabha News
Palghar Loksabha : पालघरमध्ये अखेर ठरलं, भाजपकडून हेमंत सावरांना उमेदवारी

भाजपच्या डॉ. हेमंत सावरा यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजेंद गावित यांनी आपली नाराजी लपविली नाही. तसेच ते उमेदवारी अर्ज दाखले करण्यास हि आले नाहीत. त्यामुळे गावितांच्या नाराजीचा फटका महायुतीला बसतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एकनाथ शिंदे गटाला ही जागा मिळाली नसली तरी आज भाजपतर्फे उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी माजी जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, जिल्हाप्रमुख कुंदन संखे तसेच आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्याप्रमाणात पस्थित होते.

Edited By : Umesh Bambare

Palghar loksabha News
Palghar Loksabha : 'बविआ'चा भाजपला दे धक्का! प्रतिभा पाध्येंचा पक्षप्रवेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com