Jayant Patil Vs Pankaja Munde : जयंतरावांनी मुंडेंना डिवचले; म्हणाले ‘पंकजाताई, असाहाय्य पद्धतीने उत्तर देत आहेत, माझ्या हातात काहीच नाही, असे सांगत आहेत’

Maharashtra Budget Session : समोरच्या बाकावरून जयंत पाटील यांना उद्देशून ‘तुमच्या सारखीच परिस्थिती झाली आहे’ असे विधान केले. त्याला जयंत पाटील यांनीही ‘बरोबर आहे, त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद,’ असे उत्तर दिले.
Jayant Patil-Pankaja Munde
Jayant Patil-Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 07 March : विधानसभेत आज प्रश्नोत्तराच्या तासात राज्याच्या पर्यावरण मंत्री इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत उत्तर देताना उपाय योजना करण्यासाठी टास्क फोर्स तयार करण्याची गरज आहे. पर्यावरण विभागाला केवळ नोटिसा देण्याच्या पलीकडे नेण्याची गरज आहे, असे उत्तर देत होत्या. त्यावर आमदार जयंत पाटील यांनी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे थोड्याशा असाहाय्य पद्धतीने उत्तर देत आहेत. माझ्या हातात काहीच नाही, असे सांगत होत्या, असा टोला लगावला. त्यावर पंकजा मुंडेंनी तातडीने स्पष्टीकरण देत मी असाहाय्यता मांडत नाही तर उपाय मांडत आहे, असे सांगितले.

खेडच्या आमदाराच्या प्रश्नावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, इंद्रायणीसोबत राज्यातील नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर आहे. यावर उपाय योजना करण्यासाठी टास्क फोर्स करण्याची गरज आहे. पर्यावरण विभागाला फक्त नोटिसा देण्याच्या पलीकडे न्यायची गरज आहे. नोटीस देऊन उत्तर मागण्यापेक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीत सहभागी करून घेण्याची गरज आहे. नगरविकास, जलसंपदा आणि पर्यावरण विभाग यांचा टास्क फोर्स तयार करून नदी प्रश्नाबाबत एक प्लॅन तयार करण्याची गरज आहे, असे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर हा टास्क फोर्स घेऊन येत आहोत.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या उत्तरानंतर जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रश्न विचारला. ते म्हणाले, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे थोड्याशा असाहाय्य पद्धतीने उत्तर देता आहेत, असं मला वाटतंय. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या हातात काहीच नाही. नगरविकास, ग्रामविकास आणि एमआयडीसीकडून प्रदूषण होतं. तेवढ्यात समोरच्या बाकावरून जयंत पाटील यांना उद्देशून ‘तुमच्या सारखीच परिस्थिती झाली आहे’ असे विधान केले. त्याला जयंत पाटील यांनीही ‘बरोबर आहे, त्यांना माझ्या पंक्तीत आणून बसवल्याबद्दल धन्यवाद,’ असे उत्तर दिले. पण, समोरच्या बाकावरून तुमच्या मागे बसणाऱ्यांना आनंद झाला आहे, असे विधान केले, त्यावर जयंत पाटील यांनी फक्त स्मितहास्य करत उत्तर दिले.

Jayant Patil-Pankaja Munde
Suresh Dhas's New Blast : सुरेश धसांचा नवा गौप्यस्फोट; राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यामुळे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यास विलंब

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे ह्या थोड्याशा असहाय्य पद्धतीने सांगत आहेत की, या तीनही एजन्सीचे काम हळूवारपणे सुरू आहे. टास्क फोर्स असावा, अशी त्यांची मागणी आहे. तो लवकर होणार का? पुणे महापालिका क्षेत्रात एसटीपीची कामे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. ‘जायका’ने आपल्याला मदत केली. पण, त्यांचा नियम आहे की विशिष्ट टक्क्यांपेक्षा जास्त रकमेने टेंडर गेले की ते एन्टरटेंटमेंट करत नाहीत, अशी अनेक कारणं आहेत, त्यामुळे एसटीपी झालेली नाही. नवी मुंबईत नवीन टेक्नॉलॉजी पद्धतीने पाणी शुद्ध केले जाते. ते पाणी हे पाण्यासारखं शुद्ध तयार होते. टास्क फोर्स नेमणार, त्यातील सदस्य जगभग फिरून येणार तोपर्यंत इथं प्रदूषण वाढतं, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, सांगलीतील शेरीनाल्याचा प्रश्न २७ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी सांगलीच्या आमदारांना घेऊन, आम्हाला निमंत्रित करून बेस्ट टेक्नॉलॉजीच्या वापर करून त्याची अंमलबजावणी करायला सांगल का? असा सवाल केला.

जयंत पाटील यांच्या प्रश्ना उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, मी असहाय्यता मांडत नाही तर उपाय मांडत आहे. कारण हवामान बदल आणि पर्यावरण हा जागतिक विषय आहे. वेगवेगळ्या विभागाकडून टास्क फोर्स तयार करायला वेळ लागणार नाही. जुनी टेक्नॉलॉजी बऱ्याच ठिकाणी वापरलेली असते. नवी एसओपी तयार होईपर्यंत होणाऱ्या प्रदूषणाचे काय, असा जयंत पाटील यांचा सवाल आहे.

Jayant Patil-Pankaja Munde
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांनी गिरवला मोदींचा कित्ता; लोकशाही मंदिराच्या पायरीचे दर्शन घेऊन केला विधानसभेत प्रवेश

आपण अस्तित्वात असणारे एसटीपी नीट चालवले तरी आपण बऱ्याच अंशी प्रदूषणावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यामुळे नव्या टास्क फोर्सचा उपयोग होणार आहे. सांगलीतील शेरी नाल्याबाबत वेगळी बैठक घेऊन टेक्नॉलॉजीबाबत सहकार्य करण्यात आले, असेही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com