Panvel news
Panvel news Sarkarnama

Panvel news: ठाकरेंच्या ठायी कार्यकर्त्यांच्या भावनांची किंमत कवडीमोल; माजी उपशहरप्रमुखाचा शिवसेनेत प्रवेश

Maharashtra Politics: शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण यांच्याशी संपर्क करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.
Published on

Mumbai News: पनवेलमधील ठाकरे गटाचे माजी उपशहरप्रमुख शैलेश जगनाडे, शिव वाहतूक सेनेचे ठाकरे गटाचे शहराध्यक्ष नितीन कसाबे यांनी शिवसेनेमध्ये (Shiv Sena) पक्ष प्रवेश केला.

शैलेश जगनाडे (Shailesh Jaganade) आणि नितीन कसाबे हे उबाठा गटाचे पदाधिकारी गेली 12 वर्षांपासून त्या गटाचे काम एकनिष्ठपणे करत होते. विभागातील रुग्णांना 24 तास सेवा मिळावी, यासाठी त्यांनी 16 लाख रुपये खर्च करून एक रुग्णवाहिका घेतली. ही रुग्णवाहिका पक्षाला देऊन त्याद्वारे सामाजिक काम करण्याची त्यांची इच्छा होती.

4 मार्च रोजी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पनवेलमध्ये दौऱ्यासाठी आले असता, त्यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण व्हावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, पक्ष पदाधिकाऱ्यांची एवढी साधी इच्छाही पूर्ण करावी असे त्यांना वाटले नाही. उलट साहेब काही तुमच्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन करणार नाहीत, असे उत्तर त्यांना देण्यात आले. त्यामुळे अखेर नाराज झालेल्या या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पनवेल महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण यांच्याशी संपर्क करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

Panvel news
Uday Samant: शिवतारे प्रकरण हे मला न झेपणारी गोष्ट; उदय सामंत असे का म्हणाले...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत तर केलेच, पण त्यासोबतच त्यांनी सोबत आणलेल्या रुग्णवाहिकेचे नारळ फोडून लोकार्पणदेखील केले. तसेच निःस्वार्थी भावनेने जनसेवेसाठी काम करणाऱ्या या दोन्ही कार्यकर्त्यांच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या रुग्णवाहिकांद्वारे सर्वसामान्य लोकांच्या मनात पक्षाचे स्थान निर्माण केले. खुद्द अभिनेते अमिताभ बच्चन यांचा 'कुली' सिनेमाच्या सेटवर भीषण अपघात झाला होता तेव्हा मुंबई विमानतळावर त्यांना न्यायला आलेली रुग्णवाहिका ही शिवसेनेची होती. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी तत्पर असणे हे शिवसेनेचे वैशिष्ट्य होते, असे असूनही ठाकरे गटाच्या प्रमुखांना रुग्णवाहिकेचे लोकार्पण करावे वाटू नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शिवसेनेची एवढी मातब्बर मंडळी पक्ष सोडून गेली तरी नेतृत्वाला आजही सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या भावनांची कवडीइतकीही किंमत नसल्याचेच या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आले आहे.

या पक्ष प्रवेशावेळी खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रा. मनीषा कायंदे, उपनेते विजय नहाटा, शिवसेना सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ, सुशांत शेलार, उपनेत्या कला शिंदे, विभागप्रमुख संध्या वढावकर, पनवेल जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख अॅड. प्रथमेश सोमण, शहरप्रमुख प्रसाद सोनवणे आदी उपस्थित होते. उबाठा गटाचे अवजड वाहतूक सेनेचे अध्यक्ष इंदरजित सिंह बाल यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याशिवाय मनसे वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक विजय जाधव, युवा समाजसेवक चेतन देशमुख यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Edited by: Mangesh Mahale

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com