Sharad Pawar : उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा विषय पवारांनी एका वाक्यात संपविला; म्हणाले...

Shiv Sena SC Hearing : ठाकरेंबाबत पवारांनी पुस्तकात नोंदविली काही निरीक्षणे
Uddhav Thackeray, Sharad Pawar
Uddhav Thackeray, Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Supreme Court's Final Decision : बहुप्रतिक्षेत असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गुरुवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल यांच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. यासह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसविले असते. मात्र, त्यांनी बहुमत चाचणीला सामोरे जाण्यापूर्वीच राजीनामा दिल्याने इतर सर्व बाबी गौण ठरतात. त्यामुळेच राज्यात पुन्हा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राहणार, हे आता स्पष्ट झाले आहे.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Supreme Court : तीन दिवस आधीच निकालाची तंतोतंत माहिती देणारा आमदार `कोण`?

दरम्यान, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता संघर्ष करायला हवा होता, असे ठाम मत त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकात व्यक्त केले आहे. देशातील विरोधकांची मोट बांधण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारे, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. चर्चांनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

त्यावेळी पत्रकारांनी पवार यांनी सत्तासंघर्षावर प्रश्न विचारले. मात्र पवार यांनी त्यावर आधी देशातील विरोधकांची सुरू असलेली तयारीबाबतचा मुद्दा होऊद्या, नंतर त्यावर बोलून असे सांगितले.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला नको होता, असे निरीक्षण नोंदविले आहे. त्यावर पवार म्हणाले, "यापूर्वी माझ्या पुस्तकात सर्व काही मांडले आहे. आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही."

Uddhav Thackeray, Sharad Pawar
BJP Political News : भाजपकडून बुट्टे पाटलांना मोठी जबाबदारी, पुणे 'डीपीडीसी'च्या उपसमितीच्या अध्यक्षपदी वर्णी

पवारांच्या पुस्तकात काय लिहले?

शरद पवार म्हणतात, "राज्याच्या प्रमुखाला राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी आवश्यक असते. उद्या काय होऊ शकते याचा अंदाज घेण्याची क्षमता हवी. त्यानुसार आजच काय पावले उचलायला पाहिजेत याचे राजकीय चातुर्य आवश्यक असते. याचा आभाव उद्धव ठाकरे (IUddhav Thackeray) यांच्यात जाणवला. शिवसेनेतील बंडाळीनंतर निर्माण झालेल्या पेचप्रसंगाला त्यांनी सामोरे जायला हवे होते. मात्र त्यांनी तात्काळ राजीनामा दिला अन् सरकार कोसळले.

Uddhav Thackeray, Sharad Pawar
Supreme Court's Final Decision : ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत न्यायालयाने जे सांगितले; तेच पवारांच्या पुस्तकात !

ठाकरेंनी दिले राजीनाम्याचे कारण

ठाकरे म्हणाले, "मी दिलेला राजीनामा हा चुकीचा असू शकतो. हापापलेल्या लोकांनी माझ्याविरोधात अविश्वास आणावा आणि मी त्यांच्या विश्वासदर्शक प्रस्ताव सामोरे जाणे हे मला मंजूर नव्हते. सगळे काही देऊनही ज्यांनी माझ्या पाठीत वार केला त्यांनी माझ्यावर अविश्वास आणावा हे काही मला पटलेले नाही. विश्वासघात करणाऱ्यांकडून मला विश्वासदर्शक ठरावाबद्दल विचारले जात असेल तर ते अयोग्य वाटल्याने मी राजीनामा दिला."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com