पेंग्विनसेना मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे, महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहतोय - उपाध्ये

Keshav Upadhye : बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहातोय,' अशी उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
Keshav Upadhye
Keshav UpadhyeSarkarnama
Published on
Updated on

मुंंबई : भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता अधिकच तीव्रतेने पेटलेला दिसून येत आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर भाजप आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोहोचला आहे. भाजपसोबत गेलेला एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील सत्तेचा संघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या पायरीवर पोहचला आहे. दरम्यान दसरा मेळाव्यावरही शिवसेना आणि शिंदे गटामध्ये जोरदार लढाई दिसीन येत आहे. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आता पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचत पेंग्विनसेना असा उल्लेख केला आहे.

Keshav Upadhye
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? मढ येथील बांधकामाचे महापालिकेकडून चौकशीचे आदेश

प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करत दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला पेंग्विनसेना म्हणत डिवचले आहे. उपाध्ये आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, 'शिवाजी पार्कवर पेंग्विनसेनेला दसरा मेळाव्याला परवानगी दिली पाहिजे कारण बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र हास्यजत्रेची वाट पाहातोय,' अशा शब्दात उपाध्ये यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

Keshav Upadhye
उद्धव ठाकरेंना राऊतांची भेट नाकारली; तुरुंगप्रशासन म्हणाले, त्यांना भेटायचे असेल तर…

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा होणार की नाही याबाबत संदिग्धता आहे. शिंदे गटही शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याबाबत आग्रही आहे. दरम्यान शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. आता दसरा मेळावा होणार का ? होणार असेल तर कोणाचा होईल? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com