BJP Vs MNS : आम्ही फोडाफोडी करत नाही, मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोक येतात; बावनकुळेंचा राज ठाकरेंवर पलटवार..

Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray : "पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो, वेळ द्यावा लागतो," राज ठाकरेंना टोला..
Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray :
Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray : Sarkarnamam
Published on
Updated on

Mumbai News : 'पक्ष वाढवण्यासाठी विश्वास निर्माण करावा लागतो, आयुष्यातील १८ वर्ष द्यावे लागतात, वेळ द्यावा लागतो, जे लोक येतात त्यांना आम्ही घेतो, घरी जाऊन त्यांना आणत नाही आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे, म्हणून लोक भाजपमध्ये येत आहेत. त्यांनी उलट आमचं अभिनंदन केलं पाहीजे. आम्ही कधीही फोडाफोडीचे राजकरण केलं नाही,' असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना लगावला. (Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray)

Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray :
Maharashtra Cabinet News : शिंदेंच्या आमदारांनी विरोध करूनही पवारांना मिळाले अर्थ खाते, बावनकुळे म्हणाले...

'आमच्या बरोबर अनेकवेळा बेईमानी झाली, राज्यात ही झाली. राज ठाकरे यांनी भाजप पक्षाचा प्रवास आणि विश्वास समजून घ्यावा,' असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होऊन चंद्रशेखर बावनकुळे यांना आज एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्यांनी पत्रकार परिषद घेऊन एक वर्षभरात पक्षावाढीसाठी केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली.

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप देशात चौफेर प्रगती करीत आहे. आम्ही मोदी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्षाचा विस्तार करीत आहोत. आगामी काळात मोदींजीनी केलेल्या कामांची माहिती व केंद्र सरकारच्या कामाचा संपूर्ण लेखाजोखा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोचविण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांवर असल्याचे त्यांनी सांगितले. (Latest Marathi News)

Chandrashekhar Bawankule On Raj Thackeray :
NCP vs Shivsena ; पालकमंत्री पद तटकरे, गोगावले यांच्यात नवी ठिणगी | NCP Splits | Political Crisis

'सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी काम करतात. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या अभियानाच्या माध्यमातून मला सहजपणे साथ दिली. आगामी काळात भाजपने महाजनसंपर्क अभियान सुरू करणार असून, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान ६० हजार घरांमध्ये जाण्याच्या आणि किमान ३० हजार नागरिकांच्या मोबाईलवर सरल ॲप सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत," असेही बावनकुळे म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी व्हॉट्सॲप समूह तयार करावेत. प्रत्येक आमदार, खासदार व निवडणूक प्रमुखाने समाजमाध्यमांवर सक्रीय असावे, असे सांगण्यात आले असल्याचे, यावेळी बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com