Chandrashekhar Bawankule on Cabinet expansion : अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना वित्त व नियोजन खाते देऊ नये, अशी भूमिका शिंदे गटातील आमदारांनी घेतली होती. बच्चू कडू आणि आशिष जयस्वाल यांनी तसे जाहीररीत्या बोलूनही दाखवले होते. त्यानंतरही पवारांना अर्थ खाते देण्यात आले. (The accounts that have been given have been given in coordination)
यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, अजित पवारांना अर्थ खातं देण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना जे खाते दिले आहेत, ते समन्वयाने दिले आहेत. तिन्ही पक्षांचा समन्वय होत नही, तोपर्यंत असे निर्णय होत नाहीत.
कुठलं खातं जास्त महत्वाचं किंवा कमी महत्वाचं नसतं. १३ कोटी जनतेसाठी प्रत्येक खातं महत्वाचं आहे. भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे मंत्री मिळालेल्या खात्यांमार्फत महाराष्ट्राला विकासाची नवी दिशा देतील.
आज (ता. १४) नागपुरात आले असता विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, आमचा स्ट्राईक रेट ९० टक्के करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. राज्याचे हे रॉकेट सरकार आहे. विकास कामे रॉकेटच्या स्पीड ने होत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस किंवा शिवसेनेला ज्या जागा मिळतील, तशाच आम्हालाही मिळतील. जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष करतील.
१५२ प्लस जागा निवडून आणण्याच्या भाजपच्या (BJP) घोषणेबद्दल विचारले असता, शिवसेना, राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांना आम्ही ताकद देऊ आणि त्यांची ताकद आम्हाला मिळेल. सध्या सभागृहात आमचे संख्याबळ २१० आहे, तर विरोधकांकडे केवळ ७८ संख्याबळ आहे. भविष्यात आमची ताकद वाढलेली असेल. खातेवाटपाच्या आधीच अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली होती. यावर खातेवाटपाच्या पूर्वीसुद्धा उपमुख्यमंत्री म्हणून बैठक घेता येते, असे आमदार बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.