Eknath Shinde Replied To Thackeray
Eknath Shinde Replied To Thackeray Sarkarnama

Eknath Shinde Replied To Thackeray : माणसे मरत होती, अन् उद्धव ठाकरे घरात नोटा मोजत होते; शिंदेंचा पलटवार

Shinde-Thackeray Politics : रुग्णालयातील रुग्णांचे मृत्यू हे राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे बळी आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
Published on

Nanded News : नांदेडमधील शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. रुग्णालयातील रुग्णांचे मृत्यू हे राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराचे बळी आहेत, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत केला. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काेरोना काळात लोकांचा जीव जात होता, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे घरात बसून पैसे मोजत होते. मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार आहे, असा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते दिल्लीत बोलत होते.

Eknath Shinde Replied To Thackeray
Nanded Hospital Death : उच्च न्यायालयानं नांदेडच्या घटनेवरून शिंदे सरकारला फटकारलं; "... म्हणून तुम्ही पळ काढू शकत नाही!"

कोरोना काळात जे तोंडाला मास्क लावून घरात बसून फेसबुक लाइव्ह करत होते. त्यांना माझ्यासारख्या रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यावर टीका करण्याचा अधिकार नाही. काेरोना काळात मी पीपीई किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत फिरत होतो. त्यावेळी हे घरात बसले होते. त्यांना भेटायला येणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करून दोन-दोन तास बसवून मग ते भेटत होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री या देशाने नाही तर जगाने पाहिले नसतील. एकीकडे कोरोनाने माणसं मरत होती आणि हे घरात बसून नोटा मोजण्याचं काम कर होते, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांचा खरा चेहरा हा लोकांनी काेरोना काळात पाहिलेला आहे. मुंबई महापालिकेच्या कारभारात भ्रष्टाचार झाल्याचं पाहिलेलं आहे. गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेचे भ्रष्टाचाराचे पैसे आणि कंत्राटाचे पैसे कुठे जात होते? हे सर्व चौकशीनंतर बाहेर येईल, असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Eknath Shinde Replied To Thackeray
Yashomati Thakur Criticised BJP : भाजप आणि नथुराम गोडसेंचा DNA एकच; भाजपच्या 'त्या' टीकेला यशोमती ठाकूरांचे प्रत्युत्तर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com