मुंबई : पीएफआयवरील बंदीचे राजकीय पक्षांसोबतच विविध संघटनांनीही स्वागत केले आहे.विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तसेच संघटनांनी या बंदीचे स्वागत करताना संघटनेची पाळेमुळे खणून काढावीत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. समाजात व धर्मामध्ये दुही निर्माण करून अशांतता तयार करणार्या संघटनेवर बंदी योग्यच असल्याचे सर्वांचे मत आहे.(PFI latest news)
काही आठवड्यापासून राज्यात राष्ट्रीय तपास एजन्सी (NIA) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) ने PFI शी जोडलेल्या परिसरात देशभरात विविध ठिकाणी छापेमारी केली. महाराष्ट्रात विविध ठिकाणी धडक कारवाई करुन अनेकांना ताब्यात घेतले आहे. कारवाईचे सत्र सुरु आहे.
PFI च्या कार्यकर्त्याने सोलापूरमध्ये भाजप आमदार विजयकुमार देशमुख (BJP MLA Vijaykumar Deshmukh) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती समोर आहे. सोलापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहम्मद शफी बिराजदार (Mohhamad Sharif Birajdar) नामक सोलापुरातील (Solapur) एका व्यक्तीने हस्तलिखित पत्र पाठवत विजयकुमार देशमुख यांना धमकी दिली आहे.
विजयकुमार देशमुख यांना तुझे मुंडके धडापासून वेगळे करणार आहे, ही धमकी नाही डायरेक्ट ॲक्शन प्लॅन (Action Plan) आहे, अशी धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. तरी सोलापूर पोलिस (Solapur Police) या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहेत.
देशमुख यांना पाठवलेल्या पत्रातून देशातील अनेक नेते हे पीएफआयच्या रडारवर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) टार्गेटवर असल्याची खळबळजनक माहिती या पत्रातून देण्यात आली आहे.तर नरेंद्र मोदी,अमित शाह , सुशीलकुमार शिंदे, योगी आदित्यनाथ,देवेंद्र फडणवीस यांची नावे पीएफआयच्या ब्लॅकलिस्टमध्ये आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.