Congress President Election : खर्गे की थरूर ; आज कोण अर्ज मागे घेणार ?

Congress President Election : निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे.
Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest News
Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (Congress President Election) मल्लीकार्जुन खर्गे आणि शशी थरूर (Shashi Tharoor) मैदानात आहेत. आज (शनिवार) अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. आज कोण अर्ज मागे घेणार याकडे सगळ्याचे लक्ष आहे.

निवडणुकीसाठी गांधी कुंटुबियांने कुणालाही पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे दोन्ही उमेदवारांपैकी कुणीही मागे घेण्याची शक्यता नाही, त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी आहे. झारखंड कॉंग्रेसचे नेते के एन त्रिपाठी यांचा अर्ज छाननीमध्ये रद्द झाला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर दबाव येत असल्याचा गौप्यस्फोट शशी थरुर यांनी केला आहे, "मी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा," यासाठी काही नेत्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली आहे. थरुर यांची काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांच्याशी भेट घेतली होती, त्यावेळी गांधी यांनी त्यांना याबाबत सांगितले होते.

Shashi Tharoor, Mallikarjun Kharge, Latest News
Shinde vs Thackeray : धनुष्यबाण कुणाचा ? ; ठाकरे गटाला आज दुपारी दोनपर्यंतची मुदत; आयोगाकडून पत्र

"कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घ्यावी, यासाठी गेल्या दहा वर्षांपासून राहुल गांधी यांनी सांगितले आहे. लोकांमधून अध्यक्ष निवडला गेला तर त्यांच्याकडून चांगले काम होईल," असे थरुर म्हणाले. कॉंग्रेसमधील काही बडे नेते त्यांना पाठिंबा देत नसल्याचे थरुर यांनी सांगितले. खर्गे यांच्यासोबत मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. "मी निवडणूक लढवावी असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे," असे थरुर म्हणाले.

येत्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याबाबत दोघांच्या विचारात मतभेद असल्याचे शशी थरुर यांनी सांगितले. थरूर म्हणाले, "मी राहुल गांधी यांना विश्वास दिला आहे. कॉंग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास मी गमावणार नाही, त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. युवा मतदार माझ्यासोबत आहेत,"

खर्गे आणि थरुर यांच्यात ही अध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. यातील एकाने माघार घेतली तर निवडणूक बिनविरोध होईल. १७ आँक्टोबरला मतदान होणार असून नऊ हजार सदस्य मतदान करणार आहेत. १९ आँक्टोबर रोजी निकाल लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com