Thane Political News : अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन कधी एकदा घेतो, असे सर्वसामान्य नागरिकांना झाले आहे. हीच नस पकडून भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतदारांना अयोध्या वारीसह श्रीरामाच्या दर्शनास नेण्याची तयारी सुरू केली आहे. आता पहिली विशेष ट्रेन सोडण्याचे नियोजन केले असून अयोध्येस जाणाऱ्या नागरिकांनी आपली नोंद करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळेच 'चलो अयोध्या'तून भाजप थेट मतदारांनाच साद घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराचे मोठ्या धुमधडाक्यात उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यास सर्वसामान्यांना सहभागी होता आले नाही. त्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाचे दर्शन घेता आले नाही. अयोध्येतील श्रीराम दर्शनाची प्रत्येकाला ओढ लागलेली आहे. ही नस पकडून भाजपाने आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.
अयोध्येसाठी येत्या 31 जानेवारीला पहिली विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. त्यातच या ट्रेनने अयोध्येला जाण्याची इच्छा असलेल्या व्यक्तींच्या नावापासून आधारकार्ड आणि मोबाईल क्रमांक याची नोंद करण्याचे आवाहन केले आहे. हीच नोंद भविष्यात (BJP) भाजपला निवडणुकीसाठी उपयोगी पडणार आहे. तसेच जसे ट्रेन नेली जाणार आहे तसे ट्रेनने परतीचा प्रवासही करण्याची व्यवस्थाही करून दिली आहे. ही एकच ट्रेन नसून अशाप्रकारे यापुढेही अयोध्येत विशेष ट्रेन भाजपमार्फत सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अयोध्येतील राम मंदिराचा उद्घाटन सोहळा भाजप आणि आरएसएसचा असल्याचा आरोप पहिल्यापासून विरोधकांनी केला आहे. त्यानंतर राम हे आमच्या आस्थेचा भाग असून राजकारणाचा नाही, असा टोलाही विरोधकांनी भाजपला लगावला आहे. आता भाजपकडून रामदर्शनाच्या नावाखाली मतांची बेगमी होत असल्याची टीकाही होऊ लागली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.