Ayodhya News : शिंदे सरकारची अयोध्यावारी ठरली! मंत्रिमंडळासह करणार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Politics: शिंदेंचे शिवसैनिक, राष्ट्रवादी कार्यकर्ते उपस्थित राहणार
Maharashtra Politics News update
Maharashtra Politics News updateSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : अयोध्येत राम मंदिरात रामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच झाला. या कार्यक्रमासाठी देशभरातून मान्यवरांना आमंत्रण दिलं गेलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील आमंत्रण होतं, मात्र ते गेले नाहीत. आता ते केव्हा जातील, याची तारीख पुढे आली आहे.

एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे येत्या 5 फेब्रुवारीला अयोध्येला जाणार आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळासह ते अयोध्या दौरा करणार आहेत. राज्यातील मंत्रिमंडळाला आमंत्रण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी न जाण्याचा निर्णय घेतला होता. प्राणप्रतिष्ठापना सोहळा झाल्यानंतर मंत्रिमंडळासह जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आता त्यांच्या जाण्याची तारीखदेखील निश्चित झाली आहे. ते मंत्रिमंडळासह अयोध्या दौरा करणार आहेत.

अयोध्येत भाजप करणार शक्तिप्रदर्शन

देशातील सर्व भाजपशासित राज्यांना राम मंदिरात मंत्रिमंडळासह दर्शन येऊन घेण्यासाठी तारीख देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ 5 फेब्रुवारीला जाणार आहेत. तिथे मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शनदेखील केलं जाणार आहे. भाजप पदाधिकारी, नेते या दौऱ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. जरी शिंदे सरकार अयोध्येत जाणार असलं तरी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Maharashtra Politics News update
Prakash Ambedkar: 'निजामी मराठ्यांपासून' जरांगेंनी सावध राहावे, ते घात करतील!

भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तर उपस्थित राहणार आहेत. शिंदेंचे शिवसैनिक, राष्ट्रवादीचे कार्यकर्तेदेखील उपस्थित राहणार आहेत. मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलं जाणार असून, लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर हे शक्तिप्रदर्शन केलं जाणार आहे.

मंदिर पूर्ण झाल्यावर जाणार

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण सर्वांना देण्यात आलं होतं. मात्र या सगळ्याला विरोधी पक्षांनी जाण्यासाठी नकार दिला. जोपर्यंत मंदिर पूर्ण होणार नाही, तोपर्यंत राम मंदिरात जाणे योग्य नाही, अशी भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली आहे.

त्यांच्यासोबत आमच्या नेत्यांना घेऊन आम्ही जाऊ, जेव्हा वाटेल तेव्हा जाऊ, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. याआधीदेखील उद्धव ठाकरे हे राम मंदिरात गेले होते, तेव्हा शिवसेना एक होती, मात्र आता दोन गट झाल्यावर पहिल्यांदा ठाकरे गट हे नेत्यांसोबत अयोध्येला जाणार आहेत.

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com