Thackeray Group News : भाजपला मोठा धक्का; एकनाथ पवारांचा ठाकरे गटात प्रवेश, उद्धव ठाकरेंना दिलं हे वचन

Eknath Pawar Joins Thackeray Group : भाजपला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
uddhav thackeray, eknath pawar
uddhav thackeray, eknath pawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Latest News : एकनाथ पवार यांनी मुंबईत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'मातोश्री' येथे हा प्रवेश झाला. या वेळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विनायक राऊत आणि पक्षाचे इतर नेतेही उपस्थित होते. एकनाथ पवार यांच्या ठाकरे गटातील प्रवेशाने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

uddhav thackeray, eknath pawar
Mahesh landge-Eknath Pawar Politics : महेश लांडगेंचा आखाडा सोडून एकनाथ पवार लोहा कंधारमध्ये कोणाला चितपट करणार ?

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ पवार यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. एकनाथ पवार यांनी शिवबंधन बांधून पक्ष प्रवेश केला, विनायक राऊत यांनी याची औपचारिक घोषणा केली. नांदेडमधील लोहा-कंधारचा विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. नांदेडमध्ये ठाकरेंचाच खासदार जिंकेल, विश्वास एकनाथ पवार यांनी या वेळी व्यक्त केला.

प्रत्येक मराठी माणूस हा शिवसैनिक असतो. योग्य वेळी त्याला शिवसेनेत यावंच लागतं. एकनाथ पवार हे योग्य वेळी शिवसेनेत आले आहेत. लोहा-कंधारचा आमदार हा शिवसेनेचाच असेल. संपूर्ण नांदेड जिल्ह्यात शिवसेना पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्याचे वचन एकनाथ पवार यांनी दिले आहे. हे पक्ष संघटनेत काम करणारा कार्यकर्ताच अशा प्रकारे सांगू शकतो. त्यांचं कार्यक्षेत्र हे पिंपरी-चिंचवड असलं तरी मराठवाड्यात त्यांचा चांगला वावर आहे. भाजप वाढवण्यात एकनाथ पवार यांचं फार मोठं योगदान आहे, असं शिवसेना नेते संजय राऊत या वेळी म्हणाले.

कोण आहेत एकनाथ पवार?

भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते आहेत. पिंपरी-चिंचडवमधील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक होते. याशिवाय ते गटनेतेही होते. नितीन गडकरी यांचे अत्यंत जवळचे सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. २०१२ मध्ये भाजप शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले होते. २०१४ मध्ये भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.

uddhav thackeray, eknath pawar
Nilesh Rane News : नीलेश राणेंच्या नाराजीमागे 'तो' मंत्री कोण? फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com