Mahesh landge-Eknath Pawar Politics : महेश लांडगेंचा आखाडा सोडून एकनाथ पवार लोहा कंधारमध्ये कोणाला चितपट करणार ?

Bhosari Vidhansabha Politics : भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये २०१४ मध्ये भाजप नेते एकनाथ पवार यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला.
Bhosari Vidhansabha Politics :
Bhosari Vidhansabha Politics : Sarkarnama

सचिन वाघमारे

Pimpri-Chinchwad Politics : भोसरी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये २०१४ मध्ये भाजप नेते एकनाथ पवार यांचा अगदी थोड्या मतांनी पराभव झाला. पण आता एकनाथ पवार पुन्हा एकदा नांदेडमधील लोहा कंधार मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढविणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अटीवरच त्यांनी ठाकरे गटात प्रवेश घेतल्याचे सांगितले जात आहे. भाजपने त्यांना लोहा कंधारमध्ये तयारी करण्यास सांगून ऐनवेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हट्टापोटी शब्द फिरवल्याने त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असल्याचे समजते.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने एकनाथ पवार यांचा भोसरी मतरसंघावरील दावा काहीसा कमजोर ठरत होता. त्यामुळे त्यांनी दोन पावले मागे घेत त्यांच्या गावाकडील लोहा कंधार विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले होते. त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करण्यास भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले होते.

Bhosari Vidhansabha Politics :
Nilesh Rane News : निलेश राणेंच्या नाराजीमागे 'तो' मंत्री कोण? फडणवीसांच्या बैठकीत काय ठरलं?

हट्टापोटी शब्द फिरवला

या मतदारसंघातून २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे मेहुणे व सेवानिवृत्त अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यामुळे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांची ही हक्काची जागा सोडण्यास नकार दर्शविला. येत्या काळात चिखलीकर यांच्या कन्या प्रणिता देवरे- चिखलीकर अथवा भगिनी म्हणजे आमदार शिंदे यांच्या पत्नी या ठिकाणी निवडणूक लढण्याची तयारी करीत असल्याचे समजते. त्यामुळे ऐनवेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हट्टापोटी शब्द फिरवला होता.

अचानक शब्द फिरवला

भाजप नेते एकनाथ पवार यांनी लोहा कंधार मतदारसंघ पिंजून काढत व घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत मोठी तयारी केली होती. मात्र, अचानक भाजपने शब्द फिरवल्याने केलेली तयारी वाया जाण्यास नको म्हणून त्यांनी लोहा कंधार मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर लोहा कंधार विधानसभेची उमेदवारी त्यांना दिली जाणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Bhosari Vidhansabha Politics :
Ravindra Chavan News : कल्याण लोकसभा मतदारसंघाबाबत मंत्री चव्हाणांचे सूचक विधान, चर्चांना उधाण

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com