पिंपरी पालिका बजेटवर भाऊ, दादांची छाप ; चिंचवड, भोसरीत अधिक तरतूद

पालिकेच्या ताफ्यात ते आता इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश करणार आहेत. शहर सायकल फ्रेंडली करण्याचा मनसुबाही बजेटमधून जाहीर केला आहे.
pcmc
pcmcsarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे (Pimpri Chinchwad Municipal Corporation)२०२२-२३ या आर्थिक वर्षाचे शिलकी अंदाजपत्रक तथा बजेट शुक्रवारी सादर झाले. त्यावर शहर कारभारी भाजप आमदार दादा (Mahesh Landge),भाऊंची (भोसरीचे महेश लांडगे आणि चिंचवडचे लक्ष्मण जगताप) छाप दिसून आली. कारण राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे आमदार असलेल्या शहरातील पिंपरी या तिसऱ्या मतदारसंघापेक्षा चिंचवड व भोसरीतच अधिक नवी विकासकामांची तरतूद बजेटमध्ये करण्यात आली आहे.

पिंपरी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष अॅड.नितीन लांडगे यांना पालिकेचे हे चाळीसावे बजेट सादर केले. पालिका आय़ुक्त म्हणून राजेश पाटील यांचे हे दुसरे बजेट आहे. प्रशासनाच्या तुलनेत पालिका पदाधिकारी आणि कारभाऱ्यांचा जास्त ठसा त्यावर दिसून आला आहे. पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी आपची सत्ता असलेल्या दिल्लीचा दौरा केला होता.

तेव्हा त्यांना तेथील मोहल्ला क्लिनीकची संकल्पना चांगलीच भावली होती.ती त्यांनी आता शहरात जिजाऊ क्लिनिक या नावाने राबविण्याचे ठरवले आहे. तर,दिल्लीप्रमाणे वाढते प्रदूषण कमी करण्यात पालिकेचा वाटा उचलण्याचे ठरवले आहे. त्याकरीता पालिकेच्या ताफ्यात ते आता इलेक्ट्रीक वाहनांचा समावेश करणार आहेत. शहर सायकल फ्रेंडली करण्याचा मनसुबाही बजेटमधून जाहीर केला आहे.

नव्या आर्थिक वर्षात नवे विकास प्रकल्प तथा योजना या दादा, भाऊंच्या मतदारसंघातच अधिक आहेत. सध्या स्थायी समिती अध्यक्ष हे आमदार लांडगेंच्या भोसरी मतदारसंघातील त्यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरात भोसरीत शेकडो कोटी रुपयांचे नवे विकासप्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदारसंघाचा ग्रामीण तोंडावळा झपाट्याने बदलू लागला आहे.

pcmc
आमदार 'पीए'चे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन ; 'झेडपी'च्या सभेत खडाजंगी

बजेटमध्येही या मतदारसंघातच चिखली येथे संतपीठ आणि टाऊन हॉल विकसित केला जाणार आहे. तर, आमदार जगताप यांच्या चिंचवड मतदारसंघात ते राहत असलेल्या पिंपळे गुरव या त्यांच्या बालेकिल्यात विविध खेळपट्या असलेले मैदान विकसित केले जाणार आहे. चिंचवड मतदारसंघातच पिंपळे सौदागर येथेही दुसरे असे मैदान विकसित करून शिल्प वॉल तयार केली जाणार आहे. सल्लागार नेमण्याचे पेव आता शिक्षण क्षेत्रापर्यंत आणण्यात आले आहे. आता शैक्षणिक सल्लागार नेमून ढासळलेल्या पालिका शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्कूलसारखा करण्याचा दावा बजेटमध्ये केला गेला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com