Pune Zilla Parishad
Pune Zilla Parishadsarkarnama

आमदार 'पीए'चे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन ; 'झेडपी'च्या सभेत खडाजंगी

महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. तो कोणीही असो, त्याच्यावर कारवाई करा, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Published on

पुणे : पुणे जिल्हा परिषदेतील (Pune Zilla Parishad)महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या आमदारांच्या (mla) स्वीय सहायकांवर (पीए) (pa)कारवाई करावी, यासाठी सध्या जिल्ह्यातील राजकारण तापलं आहे. यावरुन शुक्रवारी झालेल्या जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरली.

''संबधीत पीएवर कारवाई करावी,'' अशी मागणी या सभेत करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी त्या पीएवर कारवाई करण्याचा आदेश दिला.

पुणे जिल्ह्यातील एका आमदाराच्या स्वीय सहायकाने (पीए) जिल्हा परिषदेतील एका महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा मुद्दा ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडला.

या आमदाराच्या ‘पीए’वर नियमानुसार कडक कारवाई करावी, आणि यापुढे असे प्रकार घडणार नाहीत, याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी बुचके यांनी या वेळी केली. या मुद्द्यावरून सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली.

Pune Zilla Parishad
सत्तेचा गैरवापर करुन 'जरंडेश्वर'च्या अवसायनाची काढलेली नोटीस खोडसाळपणाची!

त्यानंतर यापुढे महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. तो कोणीही असो, त्याच्यावर कारवाई करा, असा आदेश जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी अधिकाऱ्यांना दिला. पुणे जिल्ह्यातील कुठल्या आमदाराची हा पीए आहे, याबाबतची चर्चा सध्या रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com