PM Modi Kalyan Sabha: मोदींच्या सभेपूर्वी रंगले 'मानापमान'; सन्मान नाही, मग पद कशाला? ; जिल्हाप्रमुखाने घेतला मोठा निर्णय

Shinde Droup District Head Arvind More Resignation: "मी जिल्हाप्रमुख आहे, शहरप्रमुख, माजी आमदार, आमदार यांना सभेच्या व्यासपीठावर स्थान आहे. मात्र मला व्यासपीठावर स्थान दिले नाही, जाणीवपूर्वक मला डावलले गेले आहे.
Pm Modi kalyan Sabha
Pm Modi kalyan SabhaSarkarnama

Kalyan News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सांयकाळी कल्याणमध्ये सभा आहे. सभेला काही तास उरले असतानाच शिवसेना जिल्हाप्रमुखांनी राजीनामा दिला आहे. मोदींच्या सभेत व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिला आहे.

"मी जिल्हाप्रमुख आहे, शहरप्रमुख, माजी आमदार, आमदार यांना सभेच्या व्यासपीठावर स्थान आहे. मात्र मला व्यासपीठावर स्थान दिले नाही, जाणीवपूर्वक मला डावलले गेले आहे, असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे कल्याण मुरबाड जिल्हाप्रमुख अरविंद मोरे (Arvind More) यांनी केला आहे.

Pm Modi kalyan Sabha
Lok Sabha Election Analysis: : संसदेत कोल्हे जाणार की आढळराव? हडपसर, भोसरीवर विजयाची भिस्त

मोदींसोबत व्यासपीठावर बसण्यासाठी स्थान न मिळाल्याने राजीनामा देत असल्याचे मोरे यांनी सांगितले. "मोदीच्या सभेत व्यासपीठावर स्थान नाही, पदाचा सन्मान नाही, मग पद कशाला," असे सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

मोदींच्या सभेच्या काही तास उरले असताना मानाअपमानावरुन मोरे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मोरेंची नाराजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूर करणार का?, मोरेंना मोदींसोबत व्यासपीठावर बसणार का, शिवसेनेचे वरिष्ठ नेते काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जिल्हाप्रमुख अरविंद मोरे आपल्या पत्रात म्हणतात,

महोदय,

मी अरविंद बाळकृष्ण मोरे, जिल्हाप्रमुख कल्याण मुरबाड विधानसभा क्षेत्र आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. ज्या जिल्हाप्रमुख पदाला धर्मवीर आंनद दिघे साहेब यांनी सन्मान प्राप्त करून दिला, आपण स्वतः अनेक वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करत असतानाच अनेक मोठे पद आपल्याकडे आपल्या उत्कृष्ट कामगिरीने चालत आली. पण आज कल्याण (प) मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांची जाहीर सभा असतांना स्टेजवरील निमंत्रीत पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हाप्रमुख म्हणून माझे नाव नाही आहे.

आमदार, शहरप्रमुख, आमदार हे स्टेजवर निमंत्रीत असतांना शिवसेना पदाचा प्रोटोकॉल प्रमाणे यजमान जिल्हा प्रमुखाला स्टेजवर उपस्थित राहण्याचा मान मिळायला हवा होता. पण जाणीवपुर्वक माझे नाव डावलले असल्याने मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.जय महाराष्ट्र

आपला नम्र,

अरविंद मोरे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com