Lok Sabha Election Analysis: : संसदेत कोल्हे जाणार की आढळराव? हडपसर, भोसरीवर विजयाची भिस्त

Shirur Lok Sabha Constituency Analysis: सर्वाधिक मतदार असलेल्या हडपसर मतदारसंघात उर्वरित पाच मतदारसंघाच्या तुलनेत सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. याद्यांमधील घोळ नेमका कुणाचा विश्‍वास सार्थ ठरवेल, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
Shirur LokSabha Constituency Analysis
Shirur LokSabha Constituency AnalysisSarkarnama
Published on
Updated on

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या शिरुर लोकसभा मतदार संघात (Shirur Lok Sabha Constituency Analysis) पारंपारिक लढतीत प्रचारापासून सुरू झालेली चुरस मतदानापर्यंत कायम राहिली. शिवाजीराव आढळराव पाटील आणि डॉ. अमोल कोल्हे या आजी-माजी खासदारांमध्ये चुरस आहे.

महायुतीकडून ऐनवेळी शिवसेना शिंदे गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील रिंगणात होते, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ.अमोल कोल्हे यांनी खिंड लढवली. उमेदवारी, प्रचार आणि प्रत्यक्ष मतदानातील चुरशीमुळे विजयाचा कौल कुणाला मिळणार, कोण बाजी मारणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात आहेत.

शिरूरसह, आंबेगाव, खेड, जुन्नर हे ग्रामीण तर हडपसर व भोसरी या शहरी भागाचा समावेश असलेल्या या संमिश्र जनभावनेच्या मतदार संघातील निकालाचा अंदाज बांधणे बहुतेकांना कठीण जात आहे. हडपसर व भोसरी कोणाच्या पारड्यात मते टाकणार यावरून शिरूर लोकसभेचा निकाल ठरणार आहे.

Shirur LokSabha Constituency Analysis
Pune Politics: निकालापूर्वीच पुण्यात सेलिब्रेशन सुरू; सुळे, धंगेकर, कोल्हेंच्या विजयाचे बॅनर झळकले!

महायुतीचे आढळराव पाटील यांचे संपूर्ण कुटुंब प्रचारातील व्यस्त होते तर डॉ.कोल्हे यांनी सक्षम प्रचार यंत्रणा राबवली होती, भोसरीतून भाजपचे महेश लांडगे यांनी शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली तर शिरूरमधून अशोक पवार यांनी प्रामाणिकपणे शरद पवार यांच्यावरची निष्ठा प्रचारात दाखवून दिली.

सर्वाधिक मतदार असलेल्या हडपसर मतदारसंघात उर्वरित पाच मतदारसंघाच्या तुलनेत सर्वांत कमी मतदानाची नोंद झाली. मतदानाचा घसरलेला हा टक्का, मोठ्या संख्येने मतदानासाठी उतरलेले सोसायटीतील मतदार आणि याद्यांमधील घोळ नेमका कुणाचा विश्‍वास सार्थ ठरवेल, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.

गेल्यावेळी हडपसर विधानसभा मतदारसंघातून ४७.८४ टक्के मतदान झाले होते. त्यावेळी डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांना मिळालेली आघाडी पाच-सहा हजारांवर आणून ठेवली होती. या वेळी या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरून तो ४७.७१ वर आला आहे. त्यामुळे हडपसर मतदारसंघातील लढाई पुन्हा अटीतटीची झाली आहे. मतदारसंघातील सुमारे सव्वा लाख मुस्लिम समाज व ७० हजारांवरील माळी समाज महत्त्वाचा ठरणार आहे. मतदार याद्यांमधील घोळ आणि उन्हाचा तडाखा, सामान्य मतदारांना बाहेर पडण्यास केलेली टाळाटाळ यामुळे मतदानाचा टक्का घसरलेला दिसून आला.

महायुतीच्या आढळराव पाटील यांच्याकडून या मतदारसंघात पाच विद्यमान आमदार डॉ.अमोल कोल्हे यांच्याकडून एकच आमदार प्रचार करत होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने त्यांनी सर्व आमदार व पदाधिकारी कामाला लावले होते, हडपसरमधून विद्यमान आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर यांच्यावर प्रचाराची जबाबदारी होती.

महाविकास आघाडीकडून शरद पवार, बाळासाहेब थोरात, भास्कर जाधव, सुप्रिया सुळे, रोहित पवार, आदित्य ठाकरे, विश्वजीत कदम, ओमराजे निंबाळकर या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या. महायुतीकडून नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्या सभा चांगल्याच गाजल्या.शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सुरेश घुले यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली.

मतदानानंतर झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अडीच लाखांनी निवडून येणार असा दावा केला तर डॉ.अमोल कोल्हे यांनी मतदार मलाच निर्णायक कौल देणार असल्याने दुसऱ्यांदा मीच संसदेत जाणार, असा दावा केला आहे. संसदेत कोण जाणार हे चार जूनला समजेल. बैलगाडा शर्यतीवरून गाजलेल्या निवडणुकीत शिवाजीराव आढळराव पाटील की डॉ.अमोल कोल्हे मैदान मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com