
New Mumbai News: राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा बसल्यानं मराठवाड्यासह अनेक ठिकाणी महापुराचं संकट ओढावलं होतं.या पूराच्या तडाख्यात शेत पिकांचं अतोनात नुकसान झालं.गुरं,जनावरं,घरात पाणी शिरुन संसारही वाहूनही गेला.या संकटानंतर उध्वस्त झालेला शेतकरी,हवालदिल कुटुंबांचं लक्ष हे केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीकड लागलेले आहे.पण एकीकडे राज्य सरकारनं 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली आहे.पण ही मदत तोकडी असल्याची टीका होत आहे.
मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील पूरसंकटानंतर बुधवारी(ता.8) पहिल्यांदाच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे पूरग्रस्तांच्या आर्थिक मदतीबाबत घोषणा करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती,पण मोदींनी आपल्या भाषणात पूरग्रस्त आणि त्यांच्या मदतीबाबत चकार शब्दही काढला नाही. मात्र, इतर अनेक मुद्द्यांवर भरभरुन बोलताना मोदींनी मराठवाड्यासह इतर ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीवर हवालदिल नुकसानग्रस्तांसाठी आधाराचे दोन शब्दही काढले नसल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी त्यांनी महाराष्ट्रातील पाऊस,पूरस्थिती आणि त्यातून शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती मोदींनी दिली होती. केंद्र सरकारकडून या पूरसंकटात भरीव मदतीसाठी निवेदनही सादर केले होते. यावेळी मोदींनी महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचंही फडणवीसांनी भेटीनंतर म्हटलं होतं.पण यावेळी केंद्राकडे मदतीसाठीचा प्रस्ताव पाठवल्यानंतर याबाबत तातडीनं निर्णय घेण्याबाबत मोदींनी आश्वासन दिल्याचंही सांगितलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यातील आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मराठीतून विजयादशमी,कोजागिरी पौर्णिमा झाल्याचं म्हणत दहा दिवसानं असलेल्या दिवाळीच्या सणासाठी शुभेच्छा दिल्या.याचवेळी मुंबईची दीर्घ प्रतिक्षा संपली.मुंबईला दुसरं आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळालं आहे.हे एअरपोर्ट या क्षेत्राला आशियातील सर्वात मोठी कनेक्टिव्हिटी ठरेल असा दावाही केला.
यावेळी मोदींनी मुंबईसारख्या वर्दळीच्या शहरात आणि ऐतिहासिक इमारतींच्या शहरात ही शानदार मेट्रो जमिनीतून तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या भाषणावेळी मेट्रोचे कामगार आणि इंजिनियर यांचंही अभिनंदन केलं.
मुंबईतील अंडरग्राऊंड मेट्रोमुळे मुंबईचा प्रवास सोपा होणार असून हे विकसित भारताचं हे जिवंत प्रतीक असल्याचे कौतुकोद्गारही मोदींनी काढले.मोदींनी यावेळी आज मला महाराष्ट्राचे सुपुत्र,महान नेते दि.बा पाटील यांचीही आठवण येत असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी सेवाभावानं काम केलं.त्यांचं कार्य प्रेरणादायी.आमच्यासाठी ही प्रेरणा आहे. त्यांचे जीवन समाज सेवा करणाऱ्यांना प्रेरणा देत राहणार असल्याचंही मोदींनी सांगितलं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी या कार्यक्रमात महायुती सरकारनं पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 32 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केल्याचं नमूद केली.तसेच या पॅकेजमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार नसल्याचं म्हटलं.याचवेळी त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून मोदी सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 33,565 कोटी रुपये दिल्याचंही सांगितलं.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या कार्यक्रमात नवी मुंबई विमानतळामुळे आर्थिक विकास, व्यापार, पर्यटन आणि रोजगाराला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. याचवेळी त्यांनी राज्याला अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी केंद्र सरकारच्या मदतीबाबतचीअपेक्षाही मोदींसमोरच अजितदादांनी बोलून दाखवली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपआपल्या भाषणात पूरपरिस्थिती आणि नुकसानीचा मुद्दा उचलून धरल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात याबाबत काहीच उल्लेख न केल्यामुळे विरोधक महायुती सरकारला घेरण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.