PM Narendra Modi Oath Taking Ceremony : नारायण राणे आणि भागवत कराडांना 'मोदी 3.0' मधून डच्चू?

Ministers To Take Oath As Modi 3.0 : महाराष्ट्रातील सहा खासदारांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. त्यात भाजप आणि शिवसेनेच्या खासदारांचा समावेश आहे.
narayan rane narendra modi bhagwat karad
narayan rane narendra modi bhagwat karadsarkarnama
Published on
Updated on

Prime Minister Narendra Oath Taking Ceremony Live : दिल्लीत सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासह कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदासाठी काही खासदार शपथ घेणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर संबंधित खासदारांना पंतप्रधान कार्यालयातून फोन करण्यात येत आहेत.

राज्यातील सहा खासदारांना फोन करण्यात आला आहे. पण, 'मोदी सरकार 2.0' मंत्रिमंडळात असलेल्या नारायण राणे ( Narayan Rane ) आणि भागवत कराड यांना डच्चू देण्यात आला आहे. 'मोदी सरकार 3.0' च्या मंत्रिमंडळात नारायण राणे आणि भागवत कराड यांना सहभागी करून घेणार नसल्याचं फोन करून कळवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

नारायण राणे आणि भागवत कराड ( Bhagwat Karad ) हे राज्यसभेवर खासदार आहेत. नारायण राणे यांच्याकडे केंद्रात सूक्ष्म, लघू, मध्यम आणि उद्यम खात्याची जबाबदारी होती. तर, भागवत कराड हे अर्थ राज्यमंत्री होते.

मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे जवळपास निश्चित झाली आहेत. तर, एका खासदाराबाबत चर्चा सुरू आहे. भाजपकडून महाराष्ट्रात निवडून आलेल्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, रिपाईंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

narayan rane narendra modi bhagwat karad
Murlidhar Mohol : मुरलीअण्णा आता डाव टाकणार, दिल्लीचाही आखाडा गाजवणार !

त्याशिवाय भाजपकडून सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या रावेरच्या रक्षा खडसे यांना आणि पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहेळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आल्याची असल्याची माहिती आहे. बुलढाण्यातून चौथ्यांदा निवडून आलेले शिवसेनेचे ( शिंदे गट ) खासदार प्रतापराव जाध यांना शपथविधीसाठी फोन आल्याचं सांगितलं जात आहे.

सहा खासदारांव्यतिरिक्त अजित पवार गटाचे राज्यसभा प्रफुल पटेल यांचेही नाव मंत्रिपदासाठी चर्चे होते. पण, त्यांना अद्याप पंतप्रधान कार्यालयाकडून फोन आलेला नाही, असं बोललं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com