BJP Mahayuti Hindi policy
BJP Mahayuti Hindi policySarkarnama

BJP Mahayuti Hindi policy : हिंदी सक्तीच्या परित्रकाची होळी, 300 जणांविरोधात गुन्हा; पोलिस कारवाईमुळे तणाव वाढणार

Police Case Against 300 Protesters Opposing Hindi Language Ordinance in Mumbai : राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद घेतली आहे.
Published on

Marathi vs Hindi language row : हिंदी भाषेच्या सक्तीप्रकरणी भाजपच्या महायुती राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत, मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डाॅ. दीपक पवार यांनी प्रतिकात्मक होळी करीत निषेध नोंदवला होता.

याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी डाॅ. दीपक पवार यांच्यासह संतोष शिंदे, संतोष घरात, वैभव मयेकर, शशी पवार, युगेंद्र साळेकर, संतोष वीर यांच्यासह 250 ते 300 जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

महायुती (Mahayuti) राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाची होळी केल्याप्रकरणी सूरज धोंडीराम खोत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा नोंदविला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 जूनला मुंबईतील मराठी पत्रकार संघासमोरील रस्त्यावर प्राथमिक शिक्षणातील तिसऱ्या भाषेच्या सक्तीविरोधात अन्यायकारक महायुती सरकारच्या निर्णयाची प्रतिकात्मक होळी केली.

या आंदोलनासाठी कोणतीही पूर्वपरवानगी न घेता व पोलिस (Police) आयुक्तांच्या जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करीत आंदोलन केले होते. बेकायदा एकत्र येत घोषणाबाजी करीत सरकारी निर्णयाची होळी केली. त्यामुळे संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला आला आहे.

BJP Mahayuti Hindi policy
Uddhav Thackeray vs Eknath Shinde : मालक समोर आला अन् गद्दार 'जय गुजरात' म्हणाला; ठाकरेंनी शिंदेंची पुरती उतरवली

उद्धव ठाकरेंचा यांनी यावेळी सरकारवर जोरदार टीका केली होती. "राज्य सरकारनं कोणताही अभ्यास न करता शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत हिंदीची सक्ती लादू देणार नाही". हिंदी भाषेला आमचा विरोध नसला, तरी हिंदीची सक्ती आम्ही राज्यातील विद्यार्थ्यांवर लादू देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.

BJP Mahayuti Hindi policy
Badlapur Firing : भाजप आमदार कथोरे घरासमोरील गोळीबारामागे शिवसेनेचा पदाधिकारी; जखमीच्या दाव्यानं खळबळ

दरम्यान, आज ठाकरे बंधूंनी मराठी आवाज विजय मेळाव्यातून मुंबईत एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. ठाकरे बंधूंनी मराठीसाठी कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही, असा इशारा राज्यातील महायुती सरकारला दिला.

तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठी भाषेचा अभिमान ठेवण्यात चूक नाही. मात्र भाषेच्या नावावर गुंडगिरी खपवून घेणार नाही, असा इशारा दिला होता. यातच मराठीसाठी आणि हिंदी सक्तीविरोधात हिंदी भाषा सक्ताचा अध्यादेशाची होळी केल्याप्रकरणी पोलिसांनी 300जणांविरुद्ध गुन्हे नोंदवल्याने पुन्हा रान पेटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com