केदार दिघेंविरोधात धमकावण्याचा गुन्हा दाखल; बलात्कार पिडीत तरुणीने दिली होती तक्रार

Kedar Dighe | Shivsena | Thane : तक्रारदार महिला ह्या खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर म्हणून काम करतात.
Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News Sarkarnama

मुंबई : धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे आणि शिवसेनेचे (Shivsena) नवनियुक्त ठाणे (Thane) जिल्हाप्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांच्याविरोधात धमकवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे आणि त्यांचा मित्र रोहित कपूर या दोन व्यक्तींविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि धमकी दिल्याप्रकरणी २३ वर्षीय पीडित महिलेकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. (Shivsena | Thane | Latest News)

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार महिला ह्या खासगी कंपनीत क्लब अॅम्बेसिटर म्हणून काम करतात. मुंबईत येणाऱ्या पाहुण्यांना क्लबच्या मेंबरशिपबाबत माहिती देण्याचे काम करतात. केदार दिघे यांच्या मित्राने २८ जुलै रोजी सेंट रेजिस हॉटेलमध्ये मेंबरशीप घेण्याच्या बहाण्याने जेवणासाठी बोलावले होते. त्यानंतर क्लब मेंबरशिपचे पैसे देण्यासाठी रुममध्ये थांबण्यास सांगितले आणि रोहित कपूरने धमकी देत बलात्कार केला असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे. दरम्यान यानंतर घाबरलेल्या महिलेने या घटनेची कुठेही वाच्यता केली नाही.

Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
नगर जिल्ह्यातील काही गट, गणांचे आरक्षण बदलणार? : 70 हरकती दाखल

मात्र, ३१ जुलै रोजी पीडित महिलेने आपल्यावर बेतलेला प्रसंग तीन मित्रांना सांगितला. तसेच याबाबत रोहित कपूरला व्हॉट्सअॅपवर याबाबत जाब विचारला. परंतु रोहित कपूरने पीडित महिलेला उत्तर न देता व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केले. त्यानंतर १ ऑगस्ट रोजी पीडितेने आपल्या मित्रांमार्फत आरोपीला विचारणा केली. तेव्हाही रोहित कपूरने कोणताही प्रतिसाद दिला नाही. मात्र त्याचवेळी रोहित कपूर याने केदार दिघे यांच्या मध्यस्थीने पैसे घेऊन सदर घटनेबाबत कोणालाही वाच्यता न करण्यास सांगितले. मात्र, पीडितेने याला नकार दिला. या नकारानंतर केदार दिघे यांनीही पिडीतेला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप आहे.

Uddhav Thackeray & Kedar Dighe Latest News
गळ्यात भाज्यांची माळ घालून रजनी पाटील राज्यसभेत !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिघे यांची ठाणे जिल्हा प्रमुखपदी निवड केली आहे. शिंदे यांच्याविरोधात ठाण्यामध्ये लढा देण्याकरिता ही निवड केली असल्याचे बोलले जात होते. अशातच आता दिघेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने येत्या काळामध्ये त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com