Poster War In Thane : शिंदे गटाला करुन दिली आनंद दिघेंच्या 'त्या' संदेशाची आठवण..ठाण्यात रंगले बॅनरवॉर

Eknath Shinde News : “गद्दारांना क्षमा नाही” हा आनंद दिघे यांनी दिलेला संदेश बॅनरच्या माध्यमातून लावला होता.
Anand Dighe
Anand Dighesarkarnama
Published on
Updated on

Thane News : ठाणे हा परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला...पण शिवसेनेत फूट पडल्यानंतर या ठिकाणी दोन गट पडले आहेत. यावरुन दोन्ही गटात नेहमी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. 'बाळासाहेबांची शिवसेने'ला आनंद दिघे यांनी दिलेल्या संदेशाची आठवण करुन देत डिवचण्याचा प्रयत्न एका कवितेतून करण्यात आला आहे.

दोन दिवसापासून कळवा परिसरात हे बॅनरवॉर रंगले आहे. एका कवितेवरुन रंगलेले हे शाब्दीक युद्ध ठाणेकर पाहत आहेत. सध्या ठाणे महापालिकेतील नगरसेवक फोडाफोडीचे राजकारण सध्या मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. नगरसेवकांची खरेदी विक्री केली जात असल्याचा आरोप केला जात आहे, अशा परिस्थितीत कळव्यातील रवींद्र पोखरकर यांनी कवितेमधून “गद्दारांना क्षमा नाही” हा आनंद दिघे यांनी दिलेला संदेश बॅनरच्या माध्यमातून लावला होता.

Anand Dighe
Maharashtra MLC Election Results : मोठी बातमी : नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांना मोठा धक्का..

“गद्दारांना क्षमा नाही” या पोखरकरांच्या कवितेची चर्चा राज्यात झाली होती. त्यानंतर त्यांनी “खोका-बोका” शिर्षक असलेल्या कवितेचे फलक लावले होते. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी पक्ष बदलणाऱ्या नगरसेवकांच्या डोळ्यात अंजन घातले होते. त्यांच्या कवितेचे बॅनर काल (बुधवारी) उतरविण्यात आले.

म्हणताच खोका – बोका

चुकला काहींच्या हृदयाचा ठोका

पसरली एकदम अस्वस्थता

कारण, कळून चुकलेय

घालवून बसलोय लोकांची आस्था

एक काय लावला गळाला

त्यांना वाटले हात लागले आभाळाला

JA म्हणतच नाही त्याने केला विकास

आम्हीच म्हणतो कळवा होते भकास

त्याच्यामुळेच झाले झकास

दिघेसाहेबच सांगून गेले गद्दारांना क्षमा नाही

ठाणे-कळवेकर हे विसरणार नाही

अशी कविता रवींद्र पोखरकर यांनी फलकावर लावली होती. याबाबत पोखरकर म्हणाले, "स्वर्गीय आनंद दिघे यांच्या हाताखाली मी देखील काम केले होते. त्यांनामी पक्ष केलेली गद्दारी कधीच सहन केली नव्हती.गद्दारांना माफी नाही, हा त्यांचा शब्द होता. आता जे सुरू आहे. ते आनंद दिघे यांनाही रुचले नसते. त्यामुळेच त्यांच्या शब्दाची आठवण मी करून दिली होती. ही आठवण गद्दारांच्या वर्मी बसली असल्यानेच त्यांनी हे फलक काढले आहेत. जनतेच्या मनात जे सुरू आहे. तेच मी बॅनरवरून व्यक्त करीत आहेत,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com