पहिल्यांदाच मंत्री झालेल्या प्राजक्त तनपुरेंची ईडीकडून सात तास चौकशी

राज्य सहकारी बॅंकेने (State Co op Bank) विक्रीस काढलेल्या साखर कारखान्याच्या खरेदीत मनी लाॅंडरिंगचा आरोप
Prajakta Tanpure
Prajakta TanpureSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Govt) मंत्र्यांच्या विरोधातील केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशीत खंड पडलेला नाही. यात आणखी एक नाव पुढे आले आहे. ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakta Tanpure) यांची अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी सुरू केली असून आज गेल्या सात तासांहून अधिक काळांहून ही ते प्रश्नांची उत्तरे देत असल्याचे पुढे आले आहे.

राज्याचे माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे हे आज ईडी कार्यालयात चौकशीसाठी गेले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर बदल्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी कुंटे यांची चौकशी असल्याचे सांगितले गेले. मात्र त्यासोबतच तनपुरे हे देखील चौकशीसाठी असल्याचे काही तासांनंतर प्रसारमाध्यमांना समजले.

Prajakta Tanpure
किरीट सोमय्या प्यादे, त्यांचे बोलवते धनी तर रावसाहेब दानवे

तनपुरे यांच्या चौकशीचा संदर्भ हा राज्य सहकारी बॅंकेने विक्री केलेल्या सहकारी साखर कारखान्यांशी संबंधात असल्याचे कळते. या बॅंंकेने लिलावात काढलेला कारखाना तनपुरे यांनी कमी किमतीत घेतल्याचा ईडीला संशय आहे. तसेच यासाठी रक्कम कशी उभी केली, याचाही शोध ईडी घेत आहे.

ईडीने राज्यातील अनेक मंत्र्यांची चौकशी सुरू ठेवली आहे. यात अजित पवार, अनिल परब या दिग्गज मंत्र्यांचा समावेश आहे. याशिवाय खासदार भावना गवळी, आमदार प्रताप सरनाईक, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही न्यायालयीन लढ्याला तोंड द्यावे लागत आहे. काही मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तींवर छापे पडले आहे. तनपुरे यांच्या विरोधातील कारवाई हे कुठपर्यंत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Prajakta Tanpure
ईडी माझ्या घरी आली तर मी त्यांचे स्वागत करेल : नवाब मलिक

तनपुरे हे 2019 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले व महाविकास आघाडी सरकारमध्ये लगेच मंत्री बनले. ते राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून निवडून आले. त्यांनी भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. त्यांच्याकडे ऊर्जाखात्यासोबत उच्च शिक्षण खात्याचे राज्यमंत्रीपद आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com