Prakash Ambedkar News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आंबेडकरांच्या घरी जाऊन भेट घेणार? "मी त्यांचं स्वागत करतो.."

Prakash Ambedkar News : आंबेडकर कुटुंबाच्या वतीने उचित सन्मान करणार...
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे महाराष्ट्राच्य दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात विशेष गोष्ट म्हणजे ते वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेणार आहेत. राजकीय वर्तुळात अशी चर्चा होत असताना प्रकाश आंबेडकर यांनीही याबाबत भाष्य केले आहे. नड्डा आपली भेट घेणार असतील तर आपलीही त्यांनी भेटण्यीची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना उधाण आले आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar News
BJP Leader Jayalaxmi Arrest : भाजप नेत्या-अभिनेत्री जयालक्ष्मीला अटक; काय आहे कारण?

प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले आहे. जे पी नड्डा हे राजगृहावर येणार की नाही याची कल्पना नाही. मला त्यांच्याकडून कसालही संदेश पाठवला गेला नाही. मात्र ते जर येत असतील तर त्यांचं मी स्वागत करणार आहे. त्यांच्या कुटुंबाच्या वतीने उचित सन्मान करणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंसोबत एकत्र निवडणुका -

उद्धव ठाकरे आणि शरद पवार (Sharad Pawar) या दोन्ही नेत्यांमध्ये आघाडीच्या जागांवाटपावर चर्चा झाली ही चांगली गोष्ट घडली आहे. आम्हाला कोणत्या जागा मिळणार याबाबत आम्ही चर्चा करु. पुढच्या बैठकीत याबाबत निर्णय होईल अशी आशा आहे. मात्र आम्ही आगामी सर्व निवडणुका सोबत लढवू असे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar News
Sangli NCP News : जयंत पाटलांची सांगली, हातकणंगलेत चाचपणी; प्रतीकसाठी फिल्डिंग...

भाजपला घाबरुन गेली -

भाजपाने (BJP) राजकीय पक्ष फोडण्याचे एकमेव काम हाती घेतले आहे. कारण भाजप घाबरुन गेली आहे. त्यांनी निवडणुका जिंकू याची शाश्वती नाही. भाजपचा ४०० पारचा नारा आम्ही काही मानत नाही. केंद्रात पुन्हा भाजप सत्तेवर येणार नाही, याची काळजी घेऊ, असेही आंबेडकर म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com