Prakash Ambedkar : देशात 3 डिसेंबरनंतर नरसंहार होणार; प्रकाश आंबेडकरांचा सावधानतेचा इशारा

Sanvidhan Sanman Mahasabha : राज्यात आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजाला एकमेकांविरोधात लढवले जात
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : 'देशात सध्या संविधान बदलाची चर्चा सुरू असली तरी राज्यकर्त्यांकडे पर्यायी व्यवस्था काय, याचे उत्तर नाही. या व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे. स्वतंत्रता, विकासामुळे तो दृढ होताना दिसत आहे. मात्र हा विश्वास तुटला तर समाज एकमेकांविरोधात लढतात. तेच आज होताना दिसत आहे. गोध्रा, मणिपूरनंतर आता 3 डिसेंबरला देशात कुठे ना कुठे नरसंहार होईल,' अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांनी सावधनतेचा इशारा दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या शिवाजी पार्कवरील संविधान सन्मान महासभेतून प्रकाश आंबेडकर बोलत होते. 'आजच्या संविधानिक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास आहे. या व्यवस्थेत आपल्या स्वातंत्र्याची, विकासाची लोकांना गॅरंटी आहे. मात्र हा विश्वास तुटला तर आराजकता माजेल. आज राज्यात आरक्षणाच्या नावाखाली समाजासमाजाला एकमेकांविरोधात लढवले जात आहे. ते थांबण्याएवजी त्याला खतपाणी घातले जाते,' असा आरोपही आंबेडकरांनी यावेळी केला.

Prakash Ambedkar
Ravindra Gaikwad : ओमराजेंना टक्कर देण्यासाठी नॉट रिचेबल रवी गायकवाड अ‍ॅक्शन मोडवर!

देशातील पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल ३ डिसेंबरला येणार आहे. यानंतर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी घटना घडण्याची शक्यताही प्रकाश आंबेडकारांनी वर्तवली. ते म्हणाले, '2004 मध्ये गोध्रा झाले. 2023 मध्ये मणिपूरचा नरसंहार झाला. आता 3 डिसेंबरनंतर देशाच्या कुठल्या ना कुठल्या भागात नव्याने नरसंहार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावध राहा. देशात भडकावणाऱ्या संघटना बऱ्यांच आहेत. त्यातील नेत्यांना सांगा तुमचा मुलगा पुढे करा, त्याच्यामागे आम्ही येतो. स्वतःचे कुटुंब सुरक्षित ठेवायचे आणि लोकांना भिडवायचे काम सध्या सुरू आहे,' असे म्हणत आंबेडकारंनी लोकांना सावधानतेचा इशाराही दिला.

'आता कुठलाही विचार न करता संविधान बदलाची भाषा सुरू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला भौगोलिक सीमा आखून देत हिंदुंची गुलामगिरी निष्ट केली. आता सरसंघचालक मोहन भागवत अखंड भारताची भाषा करतात. अखंड भारतात अफगाणिस्तानचाही समावेश होतो, हा विचारही करायला हवा. संविधान बदलायचे तर बदला, पण त्याला पर्याय काय असेल, यावर कुणीही बोलायला तयार नाही,' याकडेही आंबेडकारांनी लक्ष वेधले.

(Edited by Sunil Dhumal)

Prakash Ambedkar
Pandharpur News : शेतकऱ्यांवर 'विठ्ठल' प्रसन्न! पुढच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडून आत्ताच ऊसदराची घोषणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com