Abhijit Patil
Abhijit PatilSarkarnama

Pandharpur News : शेतकऱ्यांवर 'विठ्ठल' प्रसन्न! पुढच्या गाळप हंगामासाठी कारखान्याकडून आत्ताच ऊसदराची घोषणा

Vitthal Sahakari Sakhar Karkhana Pandharpur Big Decision : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने पुढील वर्षातील गाळप हंगामाबाबत मोठा निर्णय घेतला आहे...
Published on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये यंदाच्या गाळप हंगामात वाढीव ऊस दर देण्याची स्पर्धा लागली आहे. त्यातच आता यावर्षीच्या ऊसदराची कोंडी फोडणारे पंढपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी 2024-25 च्या गाळप हंगामाचा दर जाहीर करून टाकला आहे. पुढील वर्षातील गाळप हंगामात येणाऱ्या निडवा उसाला 100 रुपये जास्त दर देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले आहे.

Abhijit Patil
Pandharpur News : कुठेही वजन करून आणा, ऊसदर २८२५ रुपये प्रतिटन; विठ्ठल कारखान्याचा पॅटर्न राज्यभर चर्चेत

पुढील हंगामात 100 रुपयांचा अधिकचा दर

यावेळी पाटील म्हणाले की, सुरू असलेल्या गळीत हंगामात उसाचा तुटवडा आहे. कारखान्याने आतापर्यंत या हंगामात 1.75 लाख मेट्रीक टन उस गाळप केला आहे. तसेच यापुढे हंगामाध्ये एकूण 10 लाख मेट्रीक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी शेतकरी आणि सभासदांनी विठ्ठल कारखान्याला ऊस घालून सहकार्य करण्याचे आवाहन पाटील यांनी केले. तसेच यावर्षी आपण शेतकऱ्यांना टनाला 3000 रुपयांपर्यंतचा दर देणार आहोत. त्या प्रमाणे पुढील गाळप हंगामातही शेतकऱ्यांना चांगला ऊस दर दिला जाईल. तसेच ज्या शेतकऱ्यांचा निडवा ऊस गाळपास येईल त्या शेतकऱ्यांना पुढील हंगामातील दरापेक्षा 100 रुपये अधिकचा दर दिला जाणार असल्याचेही पाटील यांनी यावेळी जाहीर केले. ( Solapur Politics )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निडवा उसाच्या नोंदी

विठ्ठल कारखान्याला ऊस घालणाऱ्यांना शेतकऱ्यांच्या खोडवा ऊस तुटल्यानंतर निडव्याची नोंद कारखान्याकडून घेतली जाणार आहे. त्यानंतर पुढील गाळप हंगामात निडवा म्हणून नोंदी असलेल्या ऊसाला कारखान्याकडून 100 रुपये प्रतिटन अधिकचा भाव दिला जाणार आहे. यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यातच उजनी धरणात देखील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे या गाळप हंगामापेक्षाही जास्त प्रमाणात पुढील गाळप हंगामात उसाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पुढील वर्षीही कारखान्यांकडून उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.

Abhijit Patil
Sugarcane Rate: सोलापूरमध्ये ऊसदराची स्पर्धा; सिद्धेश्वर कारखाना देणार 3200 रुपयांचा दर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com