Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांना निवडणुकीत राहावे लागणार ‘वंचित’? 4 महिन्यांपासून हात पुढे, पण...

Prakash Ambedkar’s Stand on Local Body Elections : मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये बोलणी सुरू झाली होती. पण अखेरच्या क्षणी बोलणी फिस्कटली.
Prakash Ambedkar on alliances for upcoming local body elections.
Prakash Ambedkar on alliances for upcoming local body elections.Sarkarnama
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi Still Without Allies : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीसह महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच असणार आहे. पण या निवडणुका स्वबळावर लढायच्या की युती-आघाडीसह याबाबत अद्याप अजून कोणत्याच पक्षामध्ये एकमत झालेले दिसत नाही. सर्वच पक्षांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांवर ही जबाबदारी टाकल्याचे चित्र आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीची साथ कोणत्याही पक्षाला नको असल्याचे चित्र आहे.

‘वंचित’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर पक्षांसोबत युती करायला आम्ही तयार आहोत! हे मी 21 मे रोजी सांगितले होते आणि माझी पत्नी अंजली आंबेडकर यांनी सुद्धा 18 जून रोजी तेच सांगितले होते.

आजपर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाने वंचित बहुजन आघाडीशी युतीसाठी संपर्क साधलेला नाही, अशी माहितीही आंबेडकरांनी पोस्टमध्ये दिली आहे. भाजपने काँग्रेसला वंचित बहुजन आघाडीशी युती करू नये, असे सांगितले आहे का? भाजपकडे काँग्रेसविषयी असं काय आहे, ज्यामुळे काँग्रेस भाजपला घाबरत आहे?, असा सवाही आंबेडकरांनी केला आहे.

Prakash Ambedkar on alliances for upcoming local body elections.
Ahilyanagar Politics : अहिल्यानगर ‘स्पेशल प्रोटेक्शन झोन’? आधी खेडकर आता घायवळ... विजय कुंभार यांचा थेट घाव

आंबेडकर यांनी चार महिन्यांपूर्वी म्हटले होते की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार जिल्हा कमिटीला देण्यात आले आहेत. जिल्ह्यात भाजपला सोडून युती करण्यास हरकत नाही. याबाबत महाराष्ट्र कमिटी निर्णय घेईल, असे आंबेडकरांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.

दरम्यान, मागील वर्षी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यानही वंचित आणि महाविकास आघाडीमध्ये बोलणी सुरू झाली होती. पण अखेरच्या क्षणी बोलणी फिस्कटली. विधानसभेतही आघाडी होऊ शकली नाही. आता आंबेडकरांनी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आघाडीसाठी हात पुढे केला आहे.

Prakash Ambedkar on alliances for upcoming local body elections.
Maharashtra Flood 2025 : पावसाचा धुमाकूळ; 2019 मधील शहांच्या निर्णयाचा फायदा महाराष्ट्राला कधी? मोदींचंही ठरेना...

महाविकास आघाडीतून कुणीही अद्याप आंबेडकरांना प्रतिसाद दिलेला नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्येच आघाडी फिस्कटण्याची शक्यता आहे. त्यामुळे ‘वंचित’ला स्थानिकच्या निवडणुकीतही आघाडीपासून ‘वंचित’ राहावे लागू शकते.    

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com