Prakash Ambedkar News : अखेर ठरलं! 'वंचित'ला महाविकास आघाडीत 2 ते 3 जागा!

Vanchit Bahujan Aghadi : आघाडीतल्या समावेशाची केवळ औपचारिकता बाकी?
Prakash Ambedkar News
Prakash Ambedkar News Sarkarnama

जुई जाधव -

Mumbai News : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा जागा वाटपचा फॉर्म्युला ठरला आहे. त्याची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसात होईल, असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. वंचित बहुजन आघाडीला, महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं की नाही? हा एक मोठा प्रश्न आहे. मात्र सरकारनामाला विश्वसनीय सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार वंचितला 2 ते 3 जागा दिल्या जाणार आहेत." य़ामुळे वंचितचा आघाडीतला समावेश केवळ औपचारिकता असल्याचे आता बोलले जात आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar News
Ncp Mlas Disqualification : राष्ट्रवादी आमदारांच्या अपात्रता प्रकरणात मोठी माहिती समोर; राजकीय घडामोडींना वेग येणार

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याप्रमाणे काँग्रेस 22 जागा लढावणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 18 जागा तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 4-5 जागा देणं निश्चित केलं आहे. मात्र या सगळ्यात आता वंचितला देखील स्थान मिळणार. वंचित बहुजन आघाडीला 2-3 जागा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे.

प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीमधून निवडणूक लढवायची असल्याची इच्छा त्यांनी फार आधीपासून व्यक्त केली आहे. मात्र त्यांना आघाडीत घ्यायचं की नाही? हा एक मोठा प्रश्न होता. प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती तर केली, मात्र त्यांना सोबत घ्यायचा की नाही हा एक मोठा प्रश्न होता. प्रकाश आंबेडकर यांना जरी महाविकास आघाडी मध्ये सामील व्हायचं होतं तरी त्यांनी काँग्रेसवर टीका करणं सोडलं नव्हतं.

Prakash Ambedkar News
Bjp New Party Office News : ...अखेर वनवास संपला! पुण्यात भाजप थाटणार हक्काचं 'हायटेक' ऑफिस

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा चर्चाना उधाण आलं. मात्र आता त्यांचा समावेश हा महाविकास आघाडी मध्ये होताना पहायला मिळत आहे. भाजपच्या विरोधात लढायचं आहे आणि जे जे पक्ष भाजपच्या विरोधात आहेत त्या पक्षांनी एकत्र लढले पाहिजे, हे एकच धोरण आता आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकींमध्ये सगळ्यांचं लक्ष आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com