Prakash Amedkar : वंचितने पराभवाचे खापर महाविकास आघाडीवर फोडले; प्रकाश आंबेडकर म्हणाले...

Vanchit VS MVA and Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने 2 जागा वंचितला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar Sarkarnama

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. वंचितने लढवलेल्या 38 जागांपैकी 36 जागांवर डिपोजीट जप्त झाले. या पराभवाला महाविकास आघाडी जबाबदार असल्याचा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या निकालाने निराश झालो असलो तरी जनादेश स्वीकारून त्रुटी तपासून विधानसभेला सामोरे जाणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

याबाबत वंचितकडून Vanchit प्रसिद्ध पत्रक जाहीर केले आहे. त्यात म्हटले, महाविकास आघाडीतील काही घटकांनी जाणीवपूर्वक वंचितला सामावून घेतले नाही. आम्हाला बैठकांसाठी आमंत्रित करण्यात आले होते. परंतु, ते सर्व दिखाऊ होते. आम्ही त्यांच्या जाळ्यात अडकलो. त्यानंतर मतदारांना आमचा झालेला अपमान आणि आमच्या पक्षाप्रती महाविकास आघाडीची संकुचित वृत्ती पटवून देण्यात सपशेल अपयशी ठरलो, अशी कबुलीही दिली.

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएसोबत लढण्याचा अजेंडा INDIA आघाडीकडे नव्हता. हे लक्षात आल्यावर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वापर केला. त्यांनी 'संविधान वाचविण्याचा लढा' आमच्या मोहिमेतून घेतला. INDIA आघाडीने दलित, आदिवासी, ओबीसी आणि मुस्लिम हे भाजपशी लढण्यास सक्षम विरोधक असल्याचे मतदारांना पटवून दिले. मात्र, प्रत्यक्षात या राजकीय पक्षांनी केवळ स्वत:ला वाचवण्यासाठीच बहुजनांच्या मतांचा वापर केल्याचा आरोप आंबेडकरांनी Prakash Ambedkar केला.

महाविकास आघाडीच्या शेवटच्या बैठकीत महाविकास आघाडीने 2 जागा वंचितला देत असल्याचे सांगितले. त्यातील एक जागा अकोला आणि दुसरी जागा उत्तर मुंबई होती. महाविकास आघाडीचे नेते माध्यमाशी बोलताना या जागांचा आकडा 4 ते 6 सांगायचे आणि ते ज्या जागांचा उल्लेख करायचे त्यात आम्हाला 2019 मधे एक लाखाच्या वर मतदान मिळालेली एकही जागा नसायची, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Prakash Ambedkar
Shambhuraj Desai : देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता शंभूराज देसाई राजीनाम्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com