अंधेरी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपशी चर्चा करा ; सरनाईकांची मुख्यमंत्र्यांना विनंती

Andheri By election : मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लटकेनी अंधेरी भागात खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित होतात.
Rutuja Latke, eknath shinde
Rutuja Latke, eknath shindesarkarnama

मुंबई : मुंबईत सध्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची (Andheri By election) रणधुमाळी सुरु आहे. ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके आणि भाजपचे मुरजी पटेल यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. पटेल कमळ चिन्हावर निवडणूक लढणार असल्याने लटके-पटेल यांच्यात थेट लढत होणार आहे. ठाकरे गटाकडून लटके यांच्या जवळचे संदीप नाईक यांचा पर्यायी निवडणूक अर्ज भरला आहे. (Andheri By election latest news)

रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिनविरोध निवडणुकीची मागणी केल्यानंतर आज (सोमवारी) शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सरनाईक यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. शिंदे गटासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.

"आपल्या युतीत हि जागा भारतीय जनता पक्षाला गेली आहे, परंतु राज्याचे प्रमुख या नात्याने आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून हि निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. जेणेकरून आपल्या महाराष्ट्रच्या राजकीय संस्कृतीचे जतन तर होईलच, पण त्याच सोबत दिवंगत आमदार रमेश लटके यांना देखील एक वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली ठरेल," असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक पत्रात म्हणतात..

शिवसेनेचे आमदार कै. रमेश लटके यांच्या दुर्दैवी निधनाने अंधेरी (पूर्व) भागात विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातली आहे. तिथे त्यांच्या पत्नी श्रीमती ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि आपल्या युतीचे उमेदवार त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत.

दुबईला रमेश लटके जेव्हा आपल्या कुटुंबियांच्या समवेत गेले होते, तेव्हा माझे मित्र व उद्योगपती राज शेट्टी यांच्याच हॉटेलमध्ये ते थांबले होते. दुर्दैवाने तिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हे कळताच राज शेट्टी यांनी तेथे धाव घेतली आणि ताबडतोब त्यांना वैद्यकीय मदत केली. परंतु त्या पूर्वीच त्यांचे निधन झालेले. राज शेट्टी यांनी सर्वप्रथम दुबई येथून फोन करून ही घटना मला सांगितली. तेव्हा अक्षरशः धक्का बसला, काही सुचेना झाले. मी ताबडतोब आमदार सुनील राऊत व तत्कालीन परिवहन मंत्री अनिल परब यांना ही घटना फोन करून कळवली. त्यानंतर राज शेट्टी यांनी दुबई सरकारचे अत्यंत खडतर असे सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून लवकरात लवकर मृतदेह विमानाने मुंबईत पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. आजही तो प्रसंग आठवला तर मनाला वेदना होतात.

Rutuja Latke, eknath shinde
Congress Presidential Election : थरूर की खरगे ? ; 24 वर्षांनंतर आज मतदान

रमेश लटके हे माझे अत्यंत जवळचे मित्र होते. विधानसभेत काम करत असताना मी, सुनील राऊत आणि रमेश लटके आम्ही तिघे अनेक महत्वाच्या विषयांवर एकत्रित बसून सल्ला मसल्लत करायचो. रमेश लटके नेहमी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी विधानसभेत आवाज उठवायचे, लोकांच्या प्रति काम करण्याची त्यांची तळमळ मी जवळून पाहिली आहे. शाखाप्रमुखपासून नगरसेवक आणि आमदार असा अत्यंत खडतर प्रवास त्यांनी केला होता. मला आजही आठवते कि, मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर लटकेनी अंधेरी भागात खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित होतात. मी देखील त्या कार्यक्रमास आपल्या समवेत उपस्थित होतो, अशा जुन्या आठवणींना त्यांनी उजाळला दिला आहे.

महाराष्ट्राची एक विशेष अशी अलिखित राजकीय संस्कृती आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी मृत्युमुखी पडतो, तेव्हा आपण त्यांच्या कुटुंबियांना बिनविरोध निवडून देण्याचा एक पायंडा आहे. हि निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पत्राद्वारे त्यांचे मत मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी हिच भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com